किन्हवली : तालुक्यातील मनाचीवाडी (नडगाव) येथील पूनम आरे या सहावर्षीय चिमुरडीवर घराशेजारीच एका रानटी डुकराने हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात ती बचावली असली तरी मात्र तिचा एक हात निकामी झाला आहे.मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास ती आपल्या घरासमोरील अंगणात खेळत असताना अचानक एका पिसाळलेल्या रानटी रानडुकराने तिच्यावर हल्ला केला. या वेळी बाजूलाच असलेल्या रवींद्र आरे या तिच्या चुलत भावाने तिला वाचवण्यासाठी रानडुकरावर धावून जाऊन आपल्या बहिणीचे प्राण वाचवले.पूनमला तत्काळ शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे अत्याधुनिक सोयी नसल्याचे कारण सांगून पुढे पाठविण्यात आले. सध्या तिच्यावर जे.जे. हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून या हल्ल्यात तिचा उजवा हात मात्र निकामी झाला आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये रानडुकराची प्रचंड दहशत बसली असून वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.सदर मुलीला प्राथमिक उपचार करून महत्त्वाच्या सोईसुविधांअभावी पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय, ठाणे येथे पाठविण्यात आले, नंतर पुढे मुंबईला नेण्यात आले.- डॉ. सुधाकर शिंदे, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय शहापूर
आदिवासी मुलीवर रानडुकराचा हल्ला
By admin | Updated: January 28, 2016 01:29 IST