शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

Video : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबुक लाईव्हवर विषप्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 16:24 IST

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हवर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे एकच उडाली आहे.

मुंबई:मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हवर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे मराठा समाजात एकच उडाली आहे. फेसबुक लाईव्हवर रमेश केरे यांनी विष प्राषन केल्यानंतर, त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर बदनामी केल्याच्या आरोप रमेश केरे यांनी केला आहे. 

'गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यावर चुकीचे आरोप झाले, त्यामुळे माझी नाहक बदनामी केली. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्याविरोधात काम सुरू आहे. हे माझे शेवटचे फेसबुक लाईव्ह आहे. मागील काही दिवसांपासून ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. चंद्रकांत पाटील यांना उपसमितीच्या अध्यक्षपदी घेतले, मी त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला, जाणीवपूर्वक मला बदनाम केले. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे.' 

'मी आजवर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आलोय, पण सोशल मीडियावर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सगळ्यांची चौकशी करा, सगळ्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे. ज्या लोकांनी सीबीआय, सीआयडीच्या माध्यमातून जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली असेल, त्याची चौकशी केली पाहिजे. आशा, अक्षर, गौरी मला माफ करा,' असे म्हणत त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय?मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती. त्यामध्ये मराठा समन्वयक रमेश केरे यांचा उल्लेख होता. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आर्थिक व्यवहार झाले आणि आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न झाला, अशाप्रकारचे संभाषण त्यात आहे. त्यावर रमेश केरे यांनी कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगतिले, पण त्यांच्यावरील आरोप सुरूच राहिले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाFacebookफेसबुक