शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रमेश कदमांचा पाय आणखी खोलात; न्यायालयात खटले दाखल करण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 05:56 IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्याविरुद्ध आणखी चार घोटाळ्यांप्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्याविरुद्ध आणखी चार घोटाळ्यांप्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.मंत्रिमंडळाचा ठराव आता राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठविला जाईल आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ‘लोकमत’ने उघडकीय आणलेल्या या घोटाळ्यांची चौकशी सीआयडी करीत आहे. त्यात आतापर्यंत विविध आरोपांखाली कदम आणि अन्य अधिकारी, कर्मचारी व खासगी व्यक्तींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.हिंगोली, सोलापूर, बीड जिल्ह्यांमधील हे घोटाळे आहेत. हिंगोलीतील घोेटाळ्यात महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड, लिपिक सुजित पाटील यांनाही आरोपी करण्यात आले आहे. बीडमधील घोटाळ्यात महामंडळाचे तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक बापुराव नेटके, लक्ष्मण घोटमकुळे, सचिन कांबळे, श्रावण हातागळे यांच्याविरुद्धही दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.महामंडळाच्या विविध जिल्हा कार्यालयांमार्फत कोट्यवधी रुपये काढून अपहार करण्यात आला होता. केवळ हिंगोलीचेच उदाहरण घ्यायचे, तर बँक आॅफ बडोदाच्या तेथील शाखेतून ३० लाख रुपये सतनाम आॅटोमोबाइल्सच्या नावाने आरटीजीएसद्वारे हस्तांतरित झाले. बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून ५० लाख रुपये काढण्यात आले. महामंडळाच्या खात्यातून राजयोग आॅटोमोबाइल्सला (लातूर) १८ लाख ५० हजार रुपये वळते करण्यात आले होते.

टॅग्स :Ramesh Kadamरमेश कदम