शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

'शिवसेनेनं आजवर रामदास कदम यांना खूप काही दिलं'; मुलगा योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 12:40 IST

रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यावर आमदार योगेश कदम यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

रत्नागिरी: मागील काही दिवसांपासून एका कथित ऑडियो क्लिपमुळे शिवसेना पक्षश्रेष्ठी रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपासून झालेल्या दसरा मेळाव्यातही रामदास कदम आले नव्हते, त्यामुळे नाराजीच्या चर्चा वाढल्या. यानंतर रामदास कदम यांच्या विधान परिषदेच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण, आता या सर्व नाराजी नाट्यावर रामदास कदम यांचे चिरंजीव आणि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरेंचे आमच्यावर प्रेममाध्यमांशी संवाद साधताना योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या विधान परिषदेच्या जागेबद्दल सूचक वक्तव्यं केलं आहे. ते म्हणाले, वयाच्या 18व्या वर्षापासून रामदास कदम यांनी एकनिष्ठेने पक्षाची कामे केली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे नेतेपद दिले. राहिला प्रश्न त्या ऑडिओ क्लिपचा, तर रामदास कदम यांनी स्वतः त्या ऑडिओ क्लिपबाबत खुलासा केला आहे. ऑडिओ क्लिपचा विषय आमच्यासाठी संपलाय, त्यामुळे पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरेंचे आमच्यावर प्रेम आहे आणि आदित्य ठाकरे यांचे आमच्याशी वेगळे नाते आहे. आमच्या संबधामध्ये विरोधकांनी कटुता आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात कधीच यश येणार नाही, असं योगेश कदम म्हणाले.

उद्धव ठाकरे नाराज नाहीत...योगेश कदम पुढे म्हणाले की, पक्षश्रेष्ठी रामदास कदम यांच्यावर नाराज नाहीत, नाराजीचा प्रश्नच नाही. पक्षानं आतापर्यंत रामदास कदम यांना खूप दिलं आहे. रामदास कदम यांनी आजवर पक्षासाठी झोकून काम केल आहे. शेवटी विधान परिषदेचं तिकीट कुणाला द्यायचं हा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, त्यांचा निर्णय अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. आमच्यासाठी शिवसैनिक हेच महत्वाचे पद आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्याकडे पाहताना रामदास कदम यांचे चिरंजीव म्हणून पाहतात, असंही आमदार योगेश कदम म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना