शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Ramdas Kadam : "उद्धव ठाकरेंना मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही"; रामदास कदमांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:27 IST

Ramdas Kadam Slams Shivsena Uddhav Thackeray : संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले. याच दरम्यान आता रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत.शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले. याच दरम्यान आता रामदास कदम (Ramdas kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच "उद्धव ठाकरेंना मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही" असा गंभीर आरोप केला आहे. 

रामदास कदम यांनी "उद्धव ठाकरेंना मराठा समाजाचे लोक जे मोठे होताहेत त्यांना मोठं होऊन द्यायचं नाही. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत अशी भूमिका उद्धव ठाकरेंची आहे की काय? असा प्रश्न मला पडला आहे" असं  म्हटलं आहे. तसेच "कोण गद्दार आहे? याचं आत्मपरिक्षण तुम्ही करून बघा, 51 आमदार का जातात, शेकडो लोक सोडून का जातात? याचा विचार करा. उद्वव ठाकरे आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती" असं म्हणत टोला लगावला आहे, 

"तीन, तीन वर्षे मला बोलून दिलं नाही, भाषणं करू दिली नाहीत. शिवसेनेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. माझ्या खात्याअंतर्गत घेण्यात आलेले निर्णय आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले" असा आरोप कदम यांनी केला आहे. तसेच "मला आणि माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला" असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. हॉस्पिटलमध्ये असताना आमच्याविरोधात कटकारस्थान रचलं आहे. तुम्ही आम्हाला संपवत नाहीत तर कोकणातल्या शिवसेनेला संपवत आहात असं म्हणत रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. TV9 मराठी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"तुमच्या मनात हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं. यानंतर आता मनसेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तुमच्या मनात हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?" असा खोचक सवाल मनसेने उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेसने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाले नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्हपणा का आहे? हा पझेसिव्ह नेस आहे की असुरक्षितता?" असं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे