शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आठवलेंचे बंड शमले; राज्यसभेच्या आश्वासनावर नमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 17:13 IST

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्यासाठी सोडावा अशी मागणी आठवलेंनी वारंवार केली होती. मात्र, युतीच्या बोलणीत हा मतदारसंघ शिवसेनेला गेला होता.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करताना मित्रपक्षांना बाजुला केल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह मित्रपक्ष नाराज झाले होते. आठवले यांनी आरपीआयसाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती. मात्र, भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडत राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. आज शेवाळे यांनी आठवलेंच्या कार्यालयात जात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेसाठी आश्वस्त केल्याने आठवलेंनी माघार घेतल्याचे जाहीर केले. 

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्यासाठी सोडावा अशी मागणी आठवलेंनी वारंवार केली होती. मात्र, युतीच्या बोलणीत हा मतदारसंघ शिवसेनेला गेला होता. या जागेवर शिवसेनेने राहुल शेवाऴेंचे नाव जाहीर केले आहे. यामुळे मित्रपक्षांना जागाच न दिल्याने महादेव जानकरांसह आठवले गटही नाराज झाला होता. आठवलेंनी दक्षिण मध्य मुंबईची जागा लढविण्याचा विचार केला होता. दक्षिण मध्य मुंबईत यापूर्वी मी जिंकलो होतो. 2014 मध्ये भाजपासह मित्रपक्षांशी यासंदर्भात चर्चाही झाली होती. यामुळे मी या जागेसाठी दावेदार होतो. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शनिवारी चर्चा करत राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कॅबिनेट मंत्रीपद मिळावे अशी मागणीही केल्याचे आठवले यांनी सांगितले. 

यामुळे आज शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आठवलेंची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी आठवले यांनी राहुल शेवाळे यांना पाठिंबा जाहीर केला. शेवाळे चांगले मित्र आहेत. त्यांच्या प्रचारासाठी काम करू, असे आठवले यांनी सांगितले.तर शेवाळे यांनीही त्यांच्या ट्विटरवर आठवलेंसोबच्या भेटीचा फोटो टाकला आहे. 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Shewaleराहुल शेवाळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा