शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रामरंगी रंगले शेगाव, १३०९ भजनी दिंड्यांमध्ये दोन लाख भक्तांचा सहभाग

By admin | Updated: April 15, 2016 17:07 IST

"राम नामे रंगुनिया गेले भक्तीच्या सागरात माउलीचे दर्शन झाले पुण्यनगरीत... काय सांगू सोहळा आनंद मावेना डोळा धन्य झाले मी रामाच्या नवमीत...

"जय गजानन... जय श्रीराम'च्या जयघोषात विदभार्ची पंढरी दणाणली 
भक्तांच्या सोयीसाठी शेगावही सरसावले
फहीम देशमुख 
शेगाव:   "राम नामे रंगुनिया गेले भक्तीच्या सागरात माउलीचे दर्शन झाले पुण्यनगरीत... काय सांगू सोहळा आनंद मावेना डोळा धन्य झाले मी रामाच्या नवमीत...' या रजनी कलाने यांच्या गाजलेल्या ओळीमध्ये रविवारी संतनगरी दुमदुमली. टाळमृदंगाचा गजर...ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष आणि तप्त उन्हाच्या झळा सोसूनही "गण गण गणात बोते'च्या मंत्रघोषात तल्लीन झालेले वारकरी... विदर्भाच्या पंढरीत असे दृश्‍य दिसत होते... निमित्त होते... रामनवमी उत्सवाचे..! मयार्दा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या रामनवमी उत्सवाच्या पावन सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या तीन लाख भाविकांनी "श्रीं'च्या समाधीवर माथा टेकविला. 
श्री.संत गजानन महाराजांनीच हयात असताना सुरू केलेल्या श्रीराम जन्मोत्सवाला यावर्षी १२१ वर्ष पूर्ण झाले.  संस्थान च्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सवात संपूर्ण शेगाव राममय झाले होते. या उत्सवात १ हजार ३०९ भजनी दिंड्यांसह दोन लाख भक्तांनी सहभाग घेतला.
श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रीरामनवमी उत्सव ७एप्रिल पासून सुरू झाला होता. या उत्सवात श्री अध्यात्म रामायण स्वाहाकारास यागाचीशुक्रवारी सकाळी १0 वाजता संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणार्हूती झाली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.रमेशचंद्र डांगरा सह विश्वस्त मंडळींची उपस्थिती होती. सकाळी श्रीराम जन्माचे कीर्तन झाले. १२ वाजता सनई चौघडा हरिनाम, टाळ्यांचा ध्वनी, गुलाबपुष्पाची उधळण करीत १२१ वा श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रीराम मंदिरासमोर रजत पाळण्यात श्रीराम जन्मोत्सव संपन्न झाला. दुपारी २ वाजता श्रींचा पालखी सोहळा संतनगरीच्या परिक्रमेसाठी निघाला. या पालखी सोहळ्यात रथावर श्रीरामांची भव्य प्रतिमा होती. प्रारंभी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी पालखीतील श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा केली. तद्नंतर श्रींच्या पालखीचे रथ, मेणा व गज अश्‍वासह नगर परिक्रमेस प्रस्थान झाले. नाम विठोबाचे घ्यावे पाऊल पुढे पुढे टाकावे, असा अमृतमय अभंग गात वारकरीसह श्रींची पालखी प्रतिवर्षी ठरलेल्या मागार्ने नगर परिक्रमेसाठी निघाली. 
 
शेगावात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
 श्री रामनवमी उत्सव निमित्याने आज शक्रवारी संतनगरी शेगावात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. शहरात दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने चौकाचौकात बंदोबस्त लावला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर,ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली १२० पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथक शहरात तैनात करण्यात आले होते.
शहरात ठिकठिकाणी महाप्रसाद आणि थंडपेय 
शेगाव : शेगावात श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने शुक्रवारी श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी शेकडो भजनी दिंड्यांसह सुमारे दोन लाख भाविकांची उपस्थिती होती. श्रीराम जन्मोत्सवानंतर श्रींची गावातून गज, अश्‍व, मेणा, रथामधून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या दिंडी मिरवणुकीचे शहरात भाविकांच्यावतीने स्वागत करण्यात आले.या दिंडी मिरवणूकदरम्यान वारकर्‍यांना पालखी मागार्ने वारकर्‍यांना महाप्रसाद, थंड पाणी आणि शरबत ची व्यवस्था करण्यात आली होती. 
वारकर्‍यांची हृदयस्पर्शी सेवा 
नागपूरच्या टिमकी येथील श्री गजानन सेवा समिती, शेगाव येथील गजानन भक्त मंडळ हे भक्तांच्या चरण सेवे पासून तर सतत तीन दिवस महाप्रसादाची व्यवस्था ते करतात. याशिवाय शहरात येणार्‍या मार्गांवर अकोला, अकोट, खामगाव येथील भक्तमंडळी पायी जाणार्‍या वारकर्‍यांसाठी फराळ, महाप्रसाद, चहा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत असता त. हीच शिस्त आणि स्वच्छता पालखी सोहळ्यातही पाहावयास मिळते. पालखीमध्ये सहकारी वारकर्‍यांना ठिकठिकाणी शीत पेय आणि खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात येते. शीतपेय पिल्यानंतर ग्लास रस्त्यावर फेकून न देता काही सेवक हे वापरलेले ग्लास एका ठिकाणी गोळा करतात. प्रकटदिनाच्या निमित्ताने शहरात लाखाच्यावर भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंंत एक हजारांच्या जवळपास पाल ख्यांनी शहर गाठले असून या भक्तांची आबाळ होणार नाही, याची दक्षता ठिकठिकाणी घेतली जात आहे. याही वर्षी रामनवमी उत्सवात श्री गजानन भक्त मंडळ टिमकी नागपूर येथील भक्तमंडळी आत्मीयतेने भक्तांच्या चप्पल-जोडे ठेवण्याची मंदिराजवळ व संतनगरीतील प्रमुख मार्गावर विनामूल्य चप्पल स्टँड सेवा प्रत्येक उत्सवाला करीत आहेत. यावर्षी या मंडळाकडून ही सेवा श्रीरामनवमी उत्सवादरम्यान केली.