शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर निर्धारित जागीच बनणार - भय्याजी जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 14:57 IST

राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर राममंदिर उभारणीसाठी प्रक्रिया सुरू होईल.

नागपूर : राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर राममंदिर उभारणीसाठी प्रक्रिया सुरू होईल. या मुद्द्यावर सर्व समाजांचे एकमत होणे कठीण बाब आहे. यासाठी होणा-या प्रयत्नांचे स्वागतच आहे. परंतु राममंदिर मात्र निर्धारित जागेवरच बनणार. तेथे इतर काहीच बनू शकत नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. सरकार्यवाहपदी चौथ्यांदा निवड झाल्यानंतर त्यांनी रविवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून संघाची महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडली.

आपल्या देशात शेतक-यांची अवस्था लक्षात घेता शासनाने या मुद्द्याकडे गंभीरतेने पाहण्याची आवश्यकता आहे. शासनाने शेतक-यांप्रती संवेदनशील व्हायला हवे. प्रश्नांना समजून त्यावर तोडगा काढायला हवा. प्रसंगी धोरण बदलविले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतक-यांना आवश्यक ते उत्पादन मूल्य मिळाले पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे. सोबतच शेतक-यांनादेखील मानसिकता बदलावी लागेल, असेदेखील भय्याजी जोशी म्हणाले. यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य, अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर उपस्थित होते. 

निवडणूकांत केंद्र सरकारला जनता देईल पाठिंबा-भाजपला देशभरात मिळत असलेले यश हे त्यांच्या परिश्रमाचे फलित आहे. कुणामुळे कोणी समोर आला असे होत नाही. संघामुळे भाजप विजयी होत आहे असे नाही. समाजातील अनुकूल वातावरणामुळे भाजपला सत्ता मिळाली. देशामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे २०१९ मधील निवडणूकांत केंद्र सरकारला जनता निश्चित पाठिंबा देईल, असा विश्वास भय्याजी जोशी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ