शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

'रॅली फॉर रिव्हर नाही तर रॅली फॉर मदर' , महाराष्ट्र शासन पूर्ण शक्तीने सहभागी होणार- सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 18:00 IST

सदगुरू जग्गी वासुदेव यांनी काढलेली रॅली  ही रॅली फॉर रिव्हर नाही तर ती रॅली फॉर मदर आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन  पूर्ण शक्तीने सहभागी होईल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुंबई, दि. 19 - सदगुरू जग्गी वासुदेव यांनी काढलेली रॅली  ही रॅली फॉर रिव्हर नाही तर ती रॅली फॉर मदर आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन  पूर्ण शक्तीने सहभागी होईल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.काल नॅशनल स्पोर्टस् क्लब मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव, श्रीमती अमृता फडणवीस यांच्यासह सिने- उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.नदीला आपण माता मानतो आणि त्याच नदीला प्रदुषित करतो हे योग्य नाही. त्यामुळे सदगुरुंनी रॅली फॉर रिव्हर ची आणलेली संकल्पना ही राष्ट्र हिताची संकल्पना असून त्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे. वृक्ष लागवड किंवा रॅली फॉर रिव्हर हे फक्त कार्यक्रम नाहीत हे एक मिशन आहे. जे आपल्या सर्वांना मिळून पूर्ण करावयाचे आहे.  आईच्या ऋणाची परतफेड करता येत नाही पण वसुंधरा मातेचे ऋण वृक्ष लागवडीच्या माध्यमातून काही प्रमाणात फेडता येते. नदी ही जीवनरेखा आहे तर पाणी हे जीवन त्यामुळे आपलं जीवन असलेल्या नदी आणि वृक्ष संवर्धनासाठी  सर्वांनी या उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन ही त्यांनी केले.पर्यावरण शास्त्र फॅशनचा नाही काळजीचा विषय- सदगुरु जग्गी वासुदेवया पृथ्वीतलावरची आपली शेवटची पिढी आहे असे समजून आपण सर्व संपवत चाललो आहोत हे खुप चिंताजनक असून पर्यावरण शास्त्र  केवळ फॅशन नाही तर सर्वात मोठा काळजीचा विषय आहे असे सदगुरु जग्गी वासुदेव यांनी यावेळी म्हटले ते म्हणाले की, पर्यावरणाच्या संरक्षणात मानवी क्षमतांचा वापर करून घेणे शक्य आहे फक्त याची योग्य जाणीव होणे गरजेचे आहे. इच्छाशक्ती असेल तर आपण प्रदुषण नक्कीच कमी करू शकतो. भारतामध्ये ४ टक्के पाणी हे हिमालयीन नद्यांमधून येते तर उर्वरित पाणी हे फॉरेस्ट वर आधारित आहे हे आपले नशिब आहे. चांगले वन पाण्याचा जमीनीत चांगला निचरा करते. त्यामुळे पाणी, नदी वाचवायची असेल तर वनक्षेत्र वाढवणे, नदीकाठी मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. नदीचे नुकसान एका रात्रीत भरून निघणार नाही. हा विषय भावनिक होऊन हाताळण्याचा विषय नाही तर त्यासाठी शास्त्रीयदृष्टीकोनातून एक निश्चित कार्यक्रम आखणे आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी एकात्मिक धोरणाची गरज आहे. या कामासाठीची दीर्घकालन समर्पितता आवश्यक आहे. मातीला जीवन देण्याची गरज आहे. मातीतील ऑर्गेनिक कंटेट वाढवण्याची गरज आहे. नैसर्गिक स्त्रोतांचे शाश्वत प्रयत्नातून संवर्धन करणे गरजेचे आहे. पिक शेतीकडून आपल्याला फलोत्पादनाच्या शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणे शक्य होईल, त्यातून मातीचा पोत सुधारेल. परंतू हे करतांना कृषी आणि फळ प्रक्रिया उद्योग क्षेत्रात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.रॅली फॉर रिव्हरच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे ही सन्मानजनक बाब असल्याचे श्रीमती फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या की,   आपल्याला जी पृथ्वी मिळाली ती  त्याच वैभवाने किंबहून तिचे जतन आणि संवर्धन करून पुढच्या पिढीला देणे आवश्यक आहे, त्यासाठी सदगुरुंचे हे अभियान खुप महत्वाचे आहे. त्यातून मानवी जीवन फुलणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  महाराष्ट्राचे वनाच्छादन वाढवण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमास मोठ्याप्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी, कला, उद्योग, संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अतिशय उर्त्स्फुत वातावरणात या सर्वांनी रॅली  फॉर रिव्हर या उपक्रमाला आपला पाठिंबा जाहीर केला. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार