शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Rajyasabha Election: अतिरिक्त मतांवर सहाव्या जागेचा खेळ रंगणार; राज्यसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये चुरशीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 09:02 IST

छत्रपती संभाजीराजे यांनी आजच उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपला राज्यसभेत संख्याबळ वाढवायचे असल्याने तिसरी जागा लढवून ती जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी १० जूनला होणारी निवडणूक छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीमुळे चुरशीची होण्याची शक्यता आहे. प्रमुख राजकीय पक्ष त्यांच्याकडील अतिरिक्त मते कोणाकडे वळवतात यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असेल. 

ही निवडणूक खुल्या मतदानाने होते. पक्ष प्रतोदांना दाखवूनच मतदान करावे लागते. त्यामुळे बंडखोरी वा दगाफटक्याची शक्यता कमीच असते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे विधानसभेची सदस्यसंख्या २८७ इतकी आहे. २८७ भागिले ७ अधिक एक  म्हणजे ४४ इतका कोटा असेल. पहिल्या पसंतीची ४४ मते मिळालेल्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल. 

भाजपचे संख्याबळ १०६ असून, त्यांना सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. हे लक्षात घेता भाजपचे दोन उमेदवार नक्कीच विजयी होतील. मात्र, तिसरा उमेदवार निवडून आणणे भाजपला अशक्य आहे. तथापि, आपल्याकडील अतिरिक्त मते भाजप ज्या उमेदवाराकडे वळवेल त्याला मोठा फायदा होईल.

एकेक उमेदवार जिंकूनही शिवसेनेकडे ११, राष्ट्रवादीकडे ९ मते शिल्लक राहतात. काँग्रेसचे संख्याबळ ४४ इतके आहे आणि त्यांच्याकडे एक उमेदवार जिंकल्यानंतर शिल्लक मते नसतील. प्रमुख राजकीय पक्षांकडे शिल्लक असलेल्या मतांवरच छत्रपती संभाजीराजे यांची भिस्त असेल. भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. प्रश्न असेल तो सहाव्या जागेचा. ही जागा स्वबळावर निवडून आणण्यासाठीचे संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही.  छत्रपती संभाजीराजे यांनी आजच उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपला राज्यसभेत संख्याबळ वाढवायचे असल्याने तिसरी जागा लढवून ती जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भाजप छत्रपती संभाजीराजे यांच्या पाठीशी उभा राहिला, तर महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे.  

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना) आणि पी. चिदम्बरम (काँग्रेस) या सहा सदस्यांचा कालावधी संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती