शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच! शरद पवारांनी 'सिल्व्हर ओक'वरूनच भरला राज्यसभेचा अर्ज; वाचा नेमकं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:14 IST

Sharad Pawar Rajya Sabha Nomination: शरद पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरूनच भरला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज. निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने पार पडली प्रक्रिया. वाचा, सर्वोच्च न्यायालयाचा कोणता नियम पवारांच्या मदतीला आला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरच भरला. त्यासाठीची रीतसर परवानगी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली होती.

पवार यांना नुकताच इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला होता. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, पण विधानभवनात येऊन अर्ज भरण्याची शारीरिक स्थिती नाही, डॉक्टरांनीदेखील आपल्याला त्या बाबत सल्ला दिला आहे. त्यामुळे व्यक्तिश: अर्ज भरायला येता येणार नाही, असे पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विलास आठवले यांना कळविले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार...आठवले यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आणि त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आदेश यांचा संदर्भ घेत पवार यांना घरूनच अर्ज भरण्याची परवानगी दिली. त्यानुसार अधिकारी घरी गेले आणि अर्ज स्वीकारला.

अशी असते शपथअर्ज सादर करत असताना उमेदवाराने एक शपथही घ्यायची असते. ‘मी राज्यसभेतील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की/ गांभीर्याने प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधाननाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आाणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन’ असा या शपथपत्रातील मजकूर असतो.

मी शरदचंद्र गोविंदराव पवारपशुपतीनाथसिंग विरुद्ध हरिहरप्रसाद सिंह या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की, विशिष्ट कारणाने उमेदवारास अर्ज भरण्यास जाणे शक्य नसेल तरीही ते घरून, इस्पितळातून वा तुरुंगातून अर्ज सादर करू शकतील.उमेदवाराने अशावेळी कोणती शपथ घ्यायची याचा नमुना हा संविधानाच्या कलम ८४ (अ) च्या तिसऱ्या शेड्युलमध्ये दिलेला आहे. त्यानुसार सक्षम अधिकाऱ्यासमोर शरद पवार यांनी शपथ घेतली आणि अर्ज सादर केला. राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.शरद पवार  यांचा अर्ज त्यांच्या आमदारांनी भरला. तासगावचे रोहित पाटील हे सूचक होते. यावेळी विधिमंडळात उद्धवसेनेचे भास्कर जाधव,काँग्रेसचे सतेज पाटील,राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे  यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.मात्र, चर्चा होती ती आदित्य ठाकरे यांच्या अनुपस्थितीची.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar files Rajya Sabha nomination from home due to health.

Web Summary : Due to health concerns, Sharad Pawar filed his Rajya Sabha nomination from his residence, 'Silver Oak,' a first in the state's history. Election officials granted permission based on Supreme Court directives, allowing him to take the oath at home.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRajya Sabhaराज्यसभा