शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Rajya Sabha Election: आमदार सुहास कांदे यांचे मत बाद का झाले?; निवडणूक आयोगानं सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 01:43 IST

निवडणूक आयोगाच्या निकालात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवण्यात आली परंतु सुहास कांदे(Suhas Kande) यांचे मत बाद करण्याचे आदेश आयोगाने दिले.

मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी नाट्यमय घडामोड घडली आहे. भाजपाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेप घेतले. यानंतर भाजपा शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली. भाजपाने घेतलेल्या आक्षेपानंतर राज्यसभेची मतमोजणी थांबवण्यात आली होती. तब्बल ८ तासांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेतला. 

निवडणूक आयोगाच्या निकालात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवण्यात आली परंतु सुहास कांदे(Suhas Kande) यांचे मत बाद करण्याचे आदेश आयोगाने दिले. सुहास कांदे यांचे मत नेमकं का बाद झाले याबाबत निवडणूक आयोगाने त्यांच्या आदेशात स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने आदेशात म्हटलंय की. कांदे यांनी मतपत्रिका फोल्ड न करता पोलिंग एजेंटकडे नेली. पोलिंग एजेंटला दाखवताना त्यांची मतपत्रिका कॅमेऱ्यात तशी शेजारच्या क्युबिकलमध्ये दिसली. तसेच न दुमडलेली मतपत्रिका घेऊन ते फिरत होते आणि काहींशी बोलत होते. या सर्व प्रकारात मतपत्रिकेत कुणाला मत दिले हे दिसत असल्याने ते नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचे आदेश दिले आहेत. 

सुहास कांदे यांनी दिलं स्पष्टीकरण

मला अद्याप निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत मिळाली नाही. मी मतपत्रिका पक्षाच्या प्रतोदाला दाखवून फोल्ड केली होती. तो कागद इतका छोटा आहे. मी फोल्ड केले होते मग ती इतरांना कशी दिसेल. वरिष्ठांशी चर्चा करून या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ असं सुहास कांदे यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीच विजयी होईलमहाविकास आघाडीकडे जेवढे संख्याबळ लागते त्यापेक्षा अधिक मते आहेत. सहकारी आणि अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

मतमोजणीला सुरुवात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले होते. त्यातील १ मत बाद झाल्यानंतर आता २८४ मतांची मोजणी केली जाईल. या निवडणुकीत भाजपाचे पीयुष गोयल, अनिल बोंडे, काँग्रेसचे इमरान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी मतांचा कोटा सुरक्षित ठेवला आहे. सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडीक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत आहे. अपक्ष, घटक पक्षांच्या मतांवर शिवसेनेच्या संजय पवार यांच्या विजयाचं भवितव्य ठरणार आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा