शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अबब! राज्यसभेची १ जागा अन् कोट्यवधी पणाला; पंचतारांकित हॉटेलचा खर्च तरी पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 21:24 IST

या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. मात्र राज्यसभेत आपलाच विजय होणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरणं रंगू लागलं आहे. 

या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे तर भाजपा आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल. काँग्रेसनंही त्यांच्या आमदारांसाठी पंचतारांकित हॉटेल बुक केले आहे. येत्या १० जून रोजी मतदानापर्यंत या आमदारांचा मुक्काम या हॉटेलमध्येच असणार आहे. राज्यसभेचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यासाठी पाण्यासारखा पैसाही वाहतोय. 

ट्रायडेंट हॉटेलचं एका दिवसाचं भाडेसुप्रिअर रुम - सिंगल - १८,५०० रुपये तर डबल - २० हजार प्रिमिअम रुम - सिंगल - २२ हजार तर डबल - २३ हजार ५०० प्रिमिअम ओशन व्ह्यू रूम - सिंगल - २३ हजार ५०० तर डबल २५ हजार प्रेंसिडेंटल सूट - ३ लाख रुपये

ताज हॉटेलचं एका दिवसाचे भाडेलग्झरी रुम - २२ हजार रुपयेलग्झरी ग्रॅंड(City View) - २५ हजार रुपयेलग्झरी ग्रॅंड(Sea View) - २७ हजार ५०० रुपये ताज क्लब रुम - ३२ हजार रुपयेग्रॅंड लग्झरी रुम - १ लाख ६ हजार रुपये 

जर हिशोब केला तर पुढील ३ दिवस हे आमदार हॉटेलमध्ये थांबले तर एका आमदारांमागे हजारो रुपये खर्च होणार आहेत. अशातच महाविकास आघाडीचे १४५, भाजपाचे ११५ आमदारांचा हॉटेल खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे. तर दुसरीकडे लोकांनी निवडून दिलेल्या या आमदारांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. राज्यसभा निवडणुकीत ५ उमेदवार सहज निवडून येतील. परंतु सहाव्या उमेदवारासाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष कोट्यवधी खर्च करणार आहेत.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा