शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: १ लाखाची पैज लावा, भाजपाचे तिन्ही उमेदवार जिंकणारच; नेत्याच्या PA ची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:08 IST

अरविंद देशमुख यांनी स्वतःच फेसबुक अकाउंट आणि व्हाट्सएपच्या स्टेट्सवरून लोकांना चॅलेंज करणारी पोस्ट केली आहे.

प्रशांत भदाणे

जळगाव - राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात चुरस आहे. मात्र तत्पूर्वी भाजपा नेत्याच्या एका पीएने स्टेटस ठेवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरणात चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे. 

आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच जळगावातील भाजपच्या एका कार्यकर्त्यानेही लक्ष वेधलंय. हा कार्यकर्ता दुसरा तिसरा कुणी नाही तर भाजपा नेते गिरीश महाजन यांचा पीए अरविंद देशमुख आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे तिघे उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास अरविंद देशमुख यांना आहे. म्हणून त्यांनी सोशल मीडियावर थेट चॅलेंज देऊन एक लाख रुपयांची पैज लावण्याचं आव्हान केलंय.

अरविंद देशमुख यांनी स्वतःच फेसबुक अकाउंट आणि व्हाट्सएपच्या स्टेट्सवरून लोकांना चॅलेंज करणारी पोस्ट केली आहे. त्यांच्या या कृतीची जोरदार चर्चा आहे. भाजपा नेते गिरीश महाजन हे आपल्या बेधडक कृतीने सतत चर्चेत असतात आता त्यांच्या पीएने केलेलं चॅलेंज चर्चेत आलंय. फेसबुकवरच्या पोस्टला लोकांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.

 ...तोपर्यंत मतमोजणी होणार नाही!राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपलं आहे. राज्यातील एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. निवडणूक मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणीसाठी विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी ४ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. पण त्यास आता विलंब होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी घ्यावी लागते असा नियम आहे. यासंदर्भातील परवानगी अद्याप आलेली नाही. त्यामुळे जोवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी येत नाही तोवर मतमोजणीला सुरुवात होऊ शकत नाही. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा