शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election Counting : “ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू,” मतमोजणीच्या विलंबावरून राऊतांचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 19:55 IST

Rajya Sabha Election Counting : राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विधानसभेच्या २८५ आमदारांनी मतदान केले.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विधानसभेच्या २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतदानावेळी भाजप आमदार पराग अळवणी यांनी महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेत ही मते बाद करावीत अशी मागणी केली. याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. दरम्यान, मतमोजणीलाही विलंब होत आहे. यावरून आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला!, आता रडीचा डाव सुरू झाला!!, आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!,” असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल केला.

नक्की काय घडलं?जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काही प्रतिसाद येत नाही तोवर मतदानाला सुरूवात होणार नाही. भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले. महाराष्ट्र आणि हरियाणा येथे राज्यसभा निवडणुकीत उघडपणे मतदानाच्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले. त्याबाबत स्थानिक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदानात झालेल्या नियमभंगामुळे ही मते बाद करावीत अशी मागणी आम्ही केलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकSanjay Rautसंजय राऊत