शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

राज्यसभेच्या पाच जागांसाठी भाजपची रणनीती! व्हीप ठरेल महत्त्वाचा, मविआची कसाेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 07:39 IST

Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या ५६ जागांसाठी १६ राज्यात २७ फेब्रुवारीला मतदान हाेणार असून, राज्यातील सहा जागांपैकी सहकारी पक्षांच्या मदतीने पाच जागा जिंकण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येणार आहे.

मुंबई - राज्यसभेच्या ५६ जागांसाठी १६ राज्यात २७ फेब्रुवारीला मतदान हाेणार असून, राज्यातील सहा जागांपैकी सहकारी पक्षांच्या मदतीने पाच जागा जिंकण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येणार आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला दोन जागा जिंकण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत खुले मतदान असल्याने राज्यात पक्षादेशाचा (व्हीप) महत्वाचा ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. 

विजयाचे गणित कठीण, ठाकरे गटाची होणार कोंडीभाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे विधानसभेची एक जागा रिक्त आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे १५ ते १६ आमदार तर शरद पवारांकडे ११ आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही गटांना  निवडणुकीत विजयाचे गणित जमविणे अवघड आहे. अशातच उद्धव उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार असल्याने ठाकरे गटाची कोंडी होणार आहे. 

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबलभाजप : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०,  काँग्रेस : ४५, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्टवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ति प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ति, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३... एकूण २८७

...तर अध्यक्षांचा निर्णय राष्ट्रवादीला लागूnशिवसेनेनंतर राष्ट्रवादीमधील फुटीनंतर दोन्ही गटाची निवडणूक आयोग व विधिमंडळात लढाई सुरु आहे. त्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीला या निवडणुकीसाठी लागू हाेईल.nशिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा मिळणार का हा प्रश्न आहे. शिंदे यांच्याकडे ४० आणि १० अपक्ष तर पवार यांच्याकडे ४२ आमदार आहेत. अपक्षांचे गणित जुळल्यास दोघांचाही एक-एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी