शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर राजू शेट्टी मोर्चा काढणार

By मोरेश्वर येरम | Updated: December 16, 2020 16:33 IST

येत्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.

पुणेकेंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे हे मुकेश अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींसाठी आणले आहेत, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. याचा विरोध म्हणून मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केलं आहे. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. येत्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या ऑफीसपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. यात अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बाबा आढाव देखील सहभागी होणार असल्याचंही शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. 

शेतकरी संघटनांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; रस्ता रोखणाऱ्यांची नावं मागवली

"केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांना खरंच काही द्यायचं असेल तर हमीभाव द्या. उगाच त्यांच्यावर नको असलेले कायदे लादू नका", असं राजू शेट्टी म्हणाले. यासोबतच मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही एकत्र असल्याचं शेट्टी म्हणाले.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmer strikeशेतकरी संपMukesh Ambaniमुकेश अंबानीMumbaiमुंबई