शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारेल: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 17:09 IST

शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांविषयी असलेली बांधीलकी यांमुळे ते कृषिमंत्री या पदासाठी न्याय देऊ शकतील, अशी भावना आहे.

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठे पद मिळणार, अशी चर्चा आहे. कृषिमंत्रिपदासाठी सध्या त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारण्यास शेट्टी यांनी तयारी दर्शवली आहे.

शेट्टी यांनी लोकसभेपासून काँग्रेस आघाडीशी केलेला घरोबा विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. ‘वंचित बहुजन आघाडी’ची ऑफर असतानाही त्यांनी काँग्रेस आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना आघाडीच्या जागावाटपात सहा जागा मिळाल्या तरी, देवेंद्र भुयार यांच्या रूपाने त्यांचा एकच आमदार निवडून आला आहे. मात्र शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांविषयी असलेली बांधीलकी यांमुळे ते कृषिमंत्री या पदासाठी न्याय देऊ शकतील, अशी भावना आहे.

तर यासाठी राजू शेट्टी यांनी सुद्धा तयारी दर्शवली आहे. 'समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषीमंत्री स्वीकारू आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू,' अशी इच्छा स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांच्या हालचालींना सुद्धा वेग आला आहे. त्यामुळे अनेक नेते दिल्ली गाठून फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे. तर याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.