शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार कंपन्यांकडून निवडणुकीसाठी पैसे घेतल्याने शक्तीपीठ महामार्गाचा अटापिटा, राजू शेट्टी यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:36 IST

महामार्गाला राज्यातील तीव्र विरोध करू, कट हाणून पाडू

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाची निवदा देण्याच्या अटीवर बड्या कन्स्ट्रक्शन कंपन्याकडून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात ॲडव्हाॅन्स घेतले आहेत. यामुळेच राज्यभरातून बाधित शेतकऱ्यांचा व्यापक विरोध असूनही दररोज एक मार्ग बदलून शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा अटापिटा सरकार करीत आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकातून रविवारी केला.पत्रकात म्हटले आहे, ज्या बड्या ठेकेदारांनी निवडणुकीसाठी पैसे दिले असतील, त्यांना अन्य मार्गाने पैसे अथवा ठेके मिळवून देण्यासाठी राज्याच्या तिजोरीत सध्या पैसा उपलब्ध नाही. यामुळे एकतर शक्तीपीठचे वेगवेगळे मार्ग दाखवून संबधित बड्या ठेकेदारांची सातत्याने दिशाभूल करत राहणे किंवा जनतेच्या डोक्यावर अनावश्यक १ लाख कोटीचे कर्ज काढून त्यामधून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्याचा कट सरकारचा आहे. म्हणूनच, नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील मार्ग बदलणार, पण राज्यात शक्तीपीठ महामार्ग होणारच असल्याचे म्हटले.सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी महामार्गासाठीच्या जमीन मोजणी होऊ दिलेली नाही. रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग असताना, या महामार्गाला समांतर शक्तीपीठ महामार्ग करणे म्हणजे राज्याच्या जनतेवर १ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा टाकणे असेच आहे. सध्या अस्तित्वात असणारा महामार्ग तोट्यात चालला असून, नवीन शक्तीपीठ महामार्ग केल्यास दोन्हीही रस्ते कर्जाच्या खाईत लोटणार आहेत. राज्यात सर्वत्र शक्तीपीठ महामार्गास विरोध होत असल्याने सरकार दिशाहीन झाले आहेत.दरम्यान, केवळ सोलापूरपासून नव्हे, तर विदर्भ मराठवाड्यात देखील पर्यायी रस्ते उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणीही शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती गिरीश फोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट सोलापूरपासून पुढे सिंधुदुर्गपर्यंत बदलणार असल्याचे सरकारने सांगितले आहे, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. हा प्रकल्प फसलेला आहे. महामार्गाला ९० टक्के गावांत विरोध झाला आहे. कर्ज काढून महामार्ग बांधण्याची गरज नाही. त्यांनी विधानसभेत किंवा विधानसभेबाहेर कोठेही हा महामार्ग रद्द केल्याची घोषणा करावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग होऊ देणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shaktipeeth Highway rushed due to election funds: Raju Shetti alleges.

Web Summary : Raju Shetti alleges the government is pushing the Shaktipeeth Highway due to advance payments from construction companies made during elections. He claims the project faces widespread opposition and involves unnecessary debt for the state.