शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी राजू पाटीलला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:36 IST

नवी मुंबई- अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी राजू पाटीलला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवी मुंबई- अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी राजू पाटीलला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेली महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे ( गोरे ) यांच्या बेपत्ता प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला अटक केली आहे.बिद्रे प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर याच्या तपासानंतर पोलिसांनी आणखी एका आरोपीचा काल शोध लावला होता. जळगावमधल्या ज्ञानदेव दत्तात्रेय पाटील ऊर्फ राजू पाटील याला कळंबोली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला असून, त्याला आज 11 रोजी दुपारी पनवेल कोर्टात हजर केले. न्यायालयानं राजू पाटीलला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 364, 323, 497, 506 (2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव पाटील हा एकनाथ खडसे यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली होती. अश्विनी बिद्रे यांच्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना यातील नेमके धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांना मोठे आव्हान उभे असताना ज्ञानदेव पाटील सारखा आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना मोठे यश आलं आहे .अश्विनी बिद्रे प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या मोबाईल संभाषणाचे रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झालेली असून, या अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्या व त्यांचे शेवटचे असलेले लोकेशन नंतर त्याच वेळी अभय कुरुंदकरने ज्ञानदेव पाटील याला संपर्क केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणNavi Mumbaiनवी मुंबई