शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राजस्थानने नवे १९ जिल्हे केले, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांचे काय? २०२१च्या जनगणना अहवालासाठी अडले जिल्हानिर्मितीचे घाेडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 07:07 IST

- दीपक भातुसे  लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राजस्थानने नव्या १९ जिल्ह्यांची निर्मिती केल्यानंतर महाराष्ट्रातील अडलेल्या नव्या जिल्हानिर्मितीची चर्चा ...

- दीपक भातुसे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राजस्थानने नव्या १९ जिल्ह्यांची निर्मिती केल्यानंतर महाराष्ट्रातील अडलेल्या नव्या जिल्हानिर्मितीची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात नव्या जिल्हानिर्मितीचे निकष ठरवण्यासाठी शासनाने एक समितीही स्थापन केली होती. मात्र समितीने दिलेल्या अभिप्रायामुळे राज्यातील नव्या जिल्हानिर्मितीचे घोडे अडलेले आहे.  

शासनाने २०१४ साली नव्या जिल्हानिर्मितीचे निकष ठरवण्यासाठी महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीत नियोजन, वित्त, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, सर्व विभागीय आयुक्त यांचा समावेश होता. २०१६ साली या समितीने आपला अभिप्राय सरकारला सादर केला. ‘नव्या जिल्हानिर्मितीचे निकष ठरविल्यास लोकांकडून मोठ्या प्रमाणात नव्या जिल्हानिर्मितीच्या मागण्या पुढे येऊ शकतात. तसेच या धोरणाच्या आधारे जिल्हानिर्मितीसाठी जनहित याचिकेद्वारे न्यायालयाकडून आदेशही आणले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत काही हजार कोटीचा आर्थिक भार राज्यावर येऊ शकतो. त्यामुळे सद्यःस्थितीत धोरण न ठरविता सन २०२१ च्या जनगणनेच्या आधारे नवीन निकष निश्चित करणे योग्य ठरेल,’ असा अभिप्राय समितीने सरकारला दिला. त्यामुळे २०२१च्या जनगणनेचे आकडे येत नाहीत, तोपर्यंत राज्यात नव्या जिल्हानिर्मितीच्या हालचाली होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. 

१८ जिल्ह्यांचे विभाजन? मागील काही वर्षांत राज्य सरकारकडे विविध माध्यमांतून जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करून नवे जिल्हे निर्माण करण्याची मागणी आलेली आहे. समितीच्या अहवालानुसार ६७ नवे जिल्हे करण्याची मागणी होत आहे; तर ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार १८ जिल्ह्यांचे विभाजन करून नवे २२ जिल्हे निर्माण करण्याची जोरदार मागणी आहे.

तोवर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भागवणार n जोपर्यंत विभाजन होत नाही, तोपर्यंत जनतेच्या प्रशासकीय सोयीसाठी बीडमधील अंबाजोगाई, नाशिकमधील मालेगाव, पालघरमधील जव्हार आणि गडचिरोलीमधील अहेरी इथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. n चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे कार्यालय कार्यान्वित करण्याची शिफारस या समितीने केली होती. त्यातील चिमूरचे कार्यालय कार्यान्वित झाले असून शिर्डीच्या कार्यालयाचे उद्घाटन ११ ऑगस्ट रोजी होत आहे.

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतीक्षा.

₹५०० कोटींचा एका जिल्ह्यासाठी खर्च  n एका जिल्हानिर्मितीसाठी साधारणतः ४०० ते ५०० कोटी खर्च येतो. नव्या जिल्ह्यासाठी ५५ ते ६० नवी कार्यालये बांधावी लागतात. n यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हा न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता कार्यालय, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता कार्यालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यास, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अशा विविध कार्यालयांचा समावेश. n या कार्यालयांसाठी पदनिर्मिती, पदभरतीही करावी लागते.

अनेक जिल्हे लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय हाेत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र