शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

"जो भाऊ तुमच्यासोबत लहानाचा मोठा झाला..."; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 07:40 IST

शिवडी येथील मनसेच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आदित्यची बाजू घेतल्याबद्दल तुमचे आभार मानलेत त्यावर शर्मिला ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली

मुंबई - आभार मानायची वेळ मला आयुष्यात उद्धव ठाकरेंनी कधीच दिली नाही.किणी प्रकरणापासून आतापर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला चिमटे काढत बसतात. निदान जो भाऊ तुमच्यासोबत लहानापासून मोठा झाला. त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवला असता ना तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ आली असती. जी आता त्यांच्यावर आलीय अशा शब्दात राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

शिवडी येथील मनसेच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आदित्यची बाजू घेतल्याबद्दल तुमचे आभार मानलेत त्यावर शर्मिला ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला. तो असे करेल मला वाटत नाही. परंतु तुम्ही ज्या भावासोबत मोठे झालात परंतु किणी प्रकरणावेळी मदत का केली नाही? किणी प्रकरणावरून आजपर्यंत टोमणे देणे कधी थांबवलं आहे? सतत टोमणे देत राहतात. तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्हीदेखील आभार मानू असं त्यांनी म्हटलं. 

तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हाला कुणी अडवलं होतं? अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचे हात कुणी धरले होते का? कोविड काही महिन्यांनी सुरू झाला. धारावीचा विकास सरकारनं करावा असं तुम्हाला वाटत होते मग तुम्ही निर्णय घ्यायला हवा होता.तुम्हाला कुणी अडवले होते? कोणतेही चांगले निर्णय घ्यायला तुम्हाला कुणी थांबवले होते? राज्यात मराठ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज जे विरोधी पक्षात असतील किंवा सर्वच पक्ष असतील मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणतायेत मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला कुणी अडवलं होते, मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. 

दरम्यान,सर्व गोष्टीला कोविडचे कारण दिलं जाते, परंतु कोविड काही महिन्यांनी सुरू झाला. मराठ्यांचे आंदोलन हे वर्षानुवर्षे सुरू आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचे होते मग तेव्हा द्यायचे होते. तुम्ही विधानसभेत विधेयक पास करायचे होते. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तुम्ही बहुमतात सरकारमध्ये होता मग तेव्हा आरक्षण देऊन टाकायचे होते. धारावीचा विकास सरकारला करायचा होता मग करून टाकायचा. कुणी तुमचे हात धरले होते? आपल्याकडे टाटांसारखे अनेक ब्राँड आहेत. धारावीच्या विकासाचे टेंडर काढून त्यात जो कुणी चांगला आहे त्याला काम द्यायला हवे होते असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या. 

टॅग्स :sharmila thackerayशर्मिला ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे