शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर सभेत राज ठाकरे यांच्या पंतप्रधान मोदींकडे दोन मागण्या, एक समान नागरी कायदा अन् दुसरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:43 IST

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना राज म्हणाले, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आम्हाला काही असुया नाही. पण...

ठाणे - मनसेच्या पाडवा मेळाव्यानंतर आज राज ठाकरे यांची तोफ ठाण्यात धडाडली. राज यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचे पडसाद राज्यभर उमटले. त्यांच्या त्या भाषणानंतर राज्यातील काही पक्षांतील नेत्यांच्याही विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांना उत्तर म्हणून, आज राज ठारे यांनी ही उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे, समान नागरी कायदा करावा आणि देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा काही कायदा करावा, अशा दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत.

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आम्हाला काही असुया नाही. पण या लोकसंख्येने एकदिवस देश फुटेल. यामुळे या गोष्टी होणे आवश्यक आहे.

राज म्हणाले, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला, असे बोलतात, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला हा गैरसमज, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. तेव्हा ज्या गोष्टींसाठी मला विरोध करायचा होता, तेव्हा मी पंतप्रधान मोदींना विरोध केला. गरज पडली तर पुन्हा करीन. पण कलम 370 रद्द केल्यानंतर, अभिनंदन करणारे पहिले ट्विट माझेच होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा पहिला माणूस मीच होतो. त्यानंतर बाकी लोक बोलले, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

नोटीशीसंदर्भात काय म्हणाले राज -आय एल अँड एफ एस नावाची कंपनी होती, मी त्यात होतो. नंतर ते झेपायचे नाही म्हणून एका वर्षात त्यातून  बाहेर पडलो. त्या कंपनीसंदर्भातील ती नोटीस होती. ती नोटीस आल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवारांना येतेय म्हणून चाहूल लागली, तर एवढे नाटक केले. हाताने जर पाप केले नाही तर नोटीसा राजकीय असो अथवा कायदेशीर मी भीक घालत नाही." असेही राज यावेळी म्हणाले. त्यामुळे मला उद्या एखादी गोष्ट नाही पटली, तर मी परत विरोध करेन. पण उगाच विनाकारण भाषणाला उभे राहिले म्हणून, टीका करायची, असे करणार नाही. तसेच आता तुम्ही शेण खाल्ले आहे, यामुळे आता तुमच्यावर टीका करणार, असहे राज यांनी रोखठोक शब्दांत सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदी