प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्याच पाठीशी राहीन - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:54 AM2018-01-14T00:54:33+5:302018-01-14T00:54:36+5:30

नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात लढा तीव्र करा. हा प्रकल्प हद्दपार होईपर्यंत लढा व सरकारला असा झटका द्या की पुन्हा कोकणवर प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याची हिंमत होणार नाही.

Raj Thackeray will remain with you till the project is canceled | प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्याच पाठीशी राहीन - राज ठाकरे

प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्याच पाठीशी राहीन - राज ठाकरे

googlenewsNext

रत्नागिरी/राजापूर : नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात लढा तीव्र करा. हा प्रकल्प हद्दपार होईपर्यंत लढा व सरकारला असा झटका द्या की पुन्हा कोकणवर प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याची हिंमत होणार नाही. तुम्ही एकत्र राहणार असाल तर मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी प्रकल्पग्रस्तांना दिले.
राजापूर तालुक्यातील नाणारसह १५ गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. नाणार परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या भावना, भूमिका जाणून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी शनिवारी तेथील प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मनसेची भूमिका प्रकल्पग्रस्तांसमोर मांडली.
ठाकरे म्हणाले की, ज्याप्रमाणे गोवा, केरळमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प नेण्याचे धाडस शासन करीत नाही, त्याप्रमाणेच कोकणातून रिफायनरी प्रकल्प हद्दपार केल्यावर असे प्रदूषणकारी प्रकल्प पुन्हा येथे आणण्याचे धाडस सरकार पुन्हा कधीच करणार नाही.
आतापर्यंत अनेक लोक, नेते येथे येऊन गेले. त्यांनी आश्वासने दिली. पण इतर लोक आणि राज ठाकरे यांच्यात हाच फरक आहे.
एखादी गोष्ट मी हातामध्ये घेतल्यानंतर ती शेवटपर्यंत नेल्याशिवाय मी थांबत नाही. आता मुंबईत गेलो की मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रकल्प रद्द करा, हे त्यांच्या कानी घालेन.

‘विकले जाणाºयांना बुकला’ : प्रकल्प जर रद्द करायचा असेल तर सर्वांना एकजूट राखावी लागेल. हे मान्य आहे का, असे ठाकरे यांनी विचारले असता ‘होय’ असा जोरदार प्रतिसाद उपस्थितांनी दिला. आजपर्यंत जे प्रकल्प आले त्यांना प्रथम तीव्र विरोध झाला. नंतर पैशांची पॅकेज दिली गेली. लोक घरंगळत गेले. यापुढे जर असे प्रकल्प नको असतील तर एकजूट राखा. विकल्या जाणाºया लोकांवर लक्ष ठेवा. त्यांना बुकलले पाहिजे, हे लक्षात ठेवा. नेतृत्व करणारे विकले गेले तर तुम्हाला ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Raj Thackeray will remain with you till the project is canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.