शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे शांत बसणाऱ्यांपैकी नाही, आशिष शेलारांचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 15:22 IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीत काय रणनीती असणार आहेत, याकडे ...

मुंबई - लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीत काय रणनीती असणार आहेत, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते आपले उमेदवार उतरवणार की नाही यावरून तर्कवितर्क लावले जात असताना, राज ठाकरे हे शांत बसणार नाहीत असा सूचक इशारा भाजपचे नेते व शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलत होते.

विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे हे काय निर्णय घेणार यासाठी संपूर्ण राज्याचे लक्ष उद्या होणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्या मेळाव्याकडे लागले आहेत. मात्र त्यापूर्वीच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल बोलताना राज ठाकरे गप्प बसणार नसल्याचे म्हंटले आहे. 'ईडी'च्या चौकशी नंतर राज ठाकरे म्हणाले होते की, गप्प बसणार नाही. मात्र त्यांनतर ते अजून तरी ते शांत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना शेलार म्हणाले की, राज यांचा व्यक्तिगत स्वभाव जो मला माहित आहे, त्यानुसार ते गप्प बसणार नाहीत.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, खोटारड्या विधानांच्या आधारावर प्रचार करणाऱ्याची भूमिका जर राज ठाकरे यांनी घेतली तर त्यांना मी आजचं उत्तर देतो की, 'अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त' असे म्हणत त्यांनी राज यांच्यावर टीका केली. लोकशाहीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपल्या मतांचा प्रचार करावा पण खोटु बोलू नयेत असा टोला सुद्धा शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला.

विधानसभा निवडणुकीत मनसेला किती जागांवर विजय मिळू शकते या प्रश्नाला उत्तर देतांना शेलार म्हणाले की, राज ठाकरे यांच्या किती जागा येतील त्यापेक्षा ते निवडणूक लढवतील की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. तसेच आम्ही कुणाची चिंता करत नसून आम्हाला सगळ्यांचा सन्मान असल्याचे सुद्धा शेलार यावेळी म्हणाले.