शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंना मिळणार केंद्र सरकारचे सुरक्षाकवच; राज्य सरकारने कानाडोळा केल्याचा मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 08:25 IST

राज ठाकरे यांना पूर्वी झेड दर्जाची सुरक्षा होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी यात कपात करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. मात्र, राज यांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा अहवाल गुप्तचर खात्याने दिला होता.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता आहे. राज यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्राद्वारे केली होती. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या पत्राकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे राज यांना आता थेट केंद्र सरकारकडून सुरक्षा दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.राज ठाकरे यांना पूर्वी झेड दर्जाची सुरक्षा होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी यात कपात करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. मात्र, राज यांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा अहवाल गुप्तचर खात्याने दिला होता. या अहवालाकडे दुर्लक्ष करत सरकारने उलट सुरक्षेत कपात केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने पीएफआय या संघटनेने त्यांना धमकी दिली होती. अन्य काही धार्मिक संघटनांनीही राज यांच्या भूमिकेला विरोध करत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षा देण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना रानौत, भाजप नेते किरीट सोमय्या, खा. नवनीत राणा यांना सुरक्षा दिली होती. विशेषत: महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांना केंद्राने स्वत:चे सुरक्षाकवच बहाल केले आहे. सध्या राज ठाकरे यांनी मविआ सरकारविरोधात सूर आळवले आहेत. त्यातच मशिदींवरील भोंग्यांना ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा मशिदींच्या बाहेर  दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे हे लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना ही सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे समजते.

 अमित शहांना पत्र लिहिणार -- राज ठाकरे यांना काही संघटनांकडून धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती.- त्यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. - राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांनादेखील सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केली जाईल. - तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही याबाबत पत्र देणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMosqueमशिदPoliticsराजकारण