शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

'राज ठाकरेंनी पक्ष वाढीकडे लक्ष द्यावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:42 IST

विधानसभेला १० जागांची मागणी

पुणे : राज ठाकरे यांना कसला उद्योग राहिलेला नाही, त्यामुळे ते इव्हीएमच्या मागे लागले आहेत. ममता बॅनर्जींना भेटण्याऐवजी त्यांनी पक्षवाढीकडे लक्ष केंद्रीत करावे, सगळे विरोधक गलितगात्र झाले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन काम करत आहेत, त्यामुळे सन २०२४ नंतरच्या निवडणूकीतही आम्हीच विजयी होणार आहोत अशी जोरदार फटकेबाजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.पुणे दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी सरकारी विश्रामगृहात पत्रकारांबरोबर संवाद साधला. विधानसभेला आम्ही भाजपाकडे २२ जागांची मागणी केली आहे. तसे पत्रच त्यांना दिले आहे. १० जागा मिळाल्याच पाहिजेत. त्यात पिंपरी व पुणे कॅन्टोन्मेंट या दोन मतदार संघांचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले.आठवले म्हणाले, विकासाच्या राजकारणामुळे देशातील जनता मोदी त्यांच्या पाठीशी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहूल यांनी राजीनामा द्यायला नको होता. पक्ष उभा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत. तिहेरी तलाकवर काँग्रेसने घेतलेली भूमिका चुकीची आहे.वंचित आघाडीचा फायदा भाजपला होतोया मुद्द्यात काही तथ्य नाही, निवडणुकीतील मतदानाने ते सिद्ध केले आहे. काही जागांवर त्यांना मताधिक्य मिळाले असले, तरी आता त्यांच्यात फूट पडली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांची मूळीच भीती नाही.राजा ढालेंच्या स्मृती जपणारराजा ढाले यांनी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच चळवळीला वैचारिक मांडणीही दिली. पुस्तके हा त्यांचा ध्यास होता. रमाबाई आंबेडकर नगर येथे भव्य ग्रंथालय तयार करून त्यांच्या स्मृतीची जपणूक करण्याचा निर्धार आंबेडकरी चळवळीतील विविध कार्यकर्त्यांनी शनिवारी झालेल्या ढाले यांच्या अभिवादन सभेत केला. यासाठी ४० लाख रूपयांचा खासदार निधी देणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले