शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पोकेमॉन खेळता खेळता राज ठाकरे पोचले मातोश्रीवर

By admin | Updated: July 29, 2016 14:39 IST

खरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही सोशल मीडियावर अडकून न घेतलेल्या, त्यामुळे भरपूर वेळ असलेल्या राज ठाकरेंना पोकेमॉन गोनं वेड लावलंय.

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
राज ठाकरे का गेले असावेत मातोश्रीवर? मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पत्ता कट करण्यासाठी होणार का शिवसेना मनसेची युती? जयदेव ठाकरेंशी सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात राज करणार का मध्यस्थी? इथपासून ते उद्धवना Belated Happy Birthday करायला राज गेले मातोश्रीवर अशा अनेक ब्रेकिंग न्यूज शुक्रवारी दुपारी व्हायरल होत होत्या.
पण, कृष्णकुंजवर असलेल्या आमच्या खास सूत्रांकडून वेगळीच माहिती समोर आलीय. वर असलेल्या एकाही गोष्टीशी राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीचा संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. खरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही सोशल मीडियावर अडकून न घेतलेल्या, त्यामुळे भरपूर वेळ असलेल्या राज ठाकरेंना पोकेमॉन गोनं वेड लावलंय. पोकेमॉन गोळा करता करता दादरवरून वांद्र्याला पोचलेल्या राज ठाकरेंना पोकेमॉन खुणावत होते आणि ते गोळा करता करता राज यांचं भान हरवत होतं. पाचवी लेवल पार करण्यासाठी शेवटचा पोकेमॉन उचलण्याची गरज होती त्यावेळी राज मातोश्रीच्या बाहेर पोचले होते आणि काही फूटांवरच त्यांना आपलं लक्ष्य दिसत होतं.
साक्षात राज ठाकरे आहेत म्हटल्यावर सुरक्षा रक्षकांनी रस्ता मोकळा करून दिला आणि राज यांनी थेट उद्धव यांच्या बेडरुममध्ये जाऊन पोकेमॉन पकडलाच.
 
 
मातोश्रीवरच्या आमच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून तिथं दोघांचं काय बोलणं झालं दे देखील आम्हाला सांगितलं.
शरद काकांचा सल्ला मनावर न घेणाऱ्या व त्यामुळेच सूर्य डोक्यावर येईपर्यंत अंथरूणात असलेल्या उद्धवना राजना बघून धक्काच बसला.
त्यांनी राजना विचारलं पण अरे, भाऊराया तू तर शरदरावांचा सल्ला मनावर घेतलेला दिसतोयस की? लवकर उठायला लागलास की काय?
तर, राज म्हणाले. "छे रे... झोपलोच नाहीये काल. पोकेमॉन गो खेळतोय काल रात्रीपासून. अख्खं दादर ते वांद्रा परीसर फिरून झाला. भैय्यांप्रमाणेच सगळे पोकेमॉनसुद्धा इथंच मुक्काम ठोकून आहेत. धरला एकेकाला नी काही तासांमध्ये पाच लेवल झाल्या पण. "
उद्धवनी विचारलं अरे पण या खेळाचा राजकारणात काय उपयोग?
राज म्हणाले, "अरे दादू तुला कळत कसं नाही. पोकेमॉन पकडण्यात जर मी यशस्वी झालो तर त्याच तंत्राचा वापर करून कार्यकर्ते पण पकडीन की? माझ्याकडे त्यांचीच तर वानवा आहे. तुझं बरं आहे, बाळासाहेबांच्या कृपेनं शिवसैनिकांच्या रुपात तुला रेडीमेड कार्यकर्ते मिळालेत. आणि साहेबांची भाषणं ऐकवून नी हातात गंडे बांधून तू त्यांना धरून ठेवलयस. पण, मला मात्र त्यांना पोकेमॉन सारखं गोळावा कराव लागतं. त्यामुळे मी पोकेमॉन गो मध्ये जितका पारंगत होईन तितकी मनसे वाढेल यात काही संशय नाही."
ही सगळी माहिती मिळाल्यावर आमची तर खात्रीच झालीय, की राज नक्कीच पोकेमॉन गो खेळत खेळत मातोश्रीवर पोचलेत. कारण, राजना पोकेमॉन गोमध्ये 'मनसे गो'ची संधी दिसत्येय.