शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल"; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 20:26 IST

Raju Patil : शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आता संजय राऊत यांच्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. तसेच, याबाबत राज ठाकरे रविवारी होणाऱ्या पुण्यातील सभेत बोलणार आहेत. दरम्यान, राज ठाकरेंचा दौरा स्थगित झाल्यानंतर राजकारण तापले आहे. सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच या दौऱ्यासंदर्भात शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आता संजय राऊत यांच्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

भाजप हेच राज ठाकरेंचे प्रेरणास्थान आहे. राज ठाकरेंना पाच जूनसाठी काही सहकार्य हवे असते, तर आम्ही केले असते. अयोध्या दौरा का स्थगित केला? असा टोला संजय राऊत यांनी मनसेला लगावला होता. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. आमदार राजू पाटील म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरेंचा दौरा रद्द झाला नाही, तो पुढे ढकलण्यात आला आहे आणि आम्हाला यांची गरज नाही आहे. त्यांना कदाचित दुःख वाटलं असेल कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल. त्याचे राजकारणच हित साध्य झाले नसेल. पुन्हा एकदा यांना सुपारी द्यावी लागेल त्याचे दुःख वाटले असेल. राज साहेबांच्या तब्येतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केला आहे. राज साहेब आपली भूमिका परवा स्पष्ट करणार आहेत, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. 

'म्हणून ते एकटे जाऊ शकतात...'काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी आम्ही अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहोत, दौऱ्यासाठी नाही, असे विधान यांनी केले होते. यावरही मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या नावातच लोंढे आहे. त्यांना लोंढे घेऊन जायची गरज नाही. म्हणून ते एकटे जाऊ शकतात. त्यांनी कसे जायचे, कसे नाही जायचे हा त्यांचा विषय आहे, असे आमदार राजू पाटील म्हणाले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलSanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरे