शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"राज ठाकरे मास लीडर, ही नव्या पर्वाची सुरुवात...", महायुतीला काय फायदा होणार? शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 09:57 IST

"यामुळे राज ठाकरे आज दिल्लीला गेले याचा आनंद मलाही आहे. मी पूर्वीही बोललो होतो, की राज ठाकरे आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आता राज्यातील महायुतीचा भाग होण्याची शक्यता आहे. यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच महायुतीला आता आणखी एक नवा मित्रपक्ष मिळू शकतो. राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा माध्यमांत सुरू आहे. यासंदर्भात आता, "मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे. राज साहेब मास लिडर आहेत. म्हणून याचा महायुतीला फायदाच होईल," असे शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते तथा आमदार संयज शिरसाट यांनी म्हटले आहे. ते एका वृत्त वाहीनीसोबत बोलत होते.

ही नवीन पर्वाची सुरुवात -शिरसाट म्हणाले, "आजच्या राजकारणात एकटा लढू शकत नाही, असी परिस्थिती आहे. यामुळे तुम्ही पाहिलं तर कुठलाही पक्ष असेल, तो इतरांना बरोबर घेऊन आपली लढाई लढण्याच्या मनःस्थितीत आहे. यामुळे राज ठाकरेही गेल्या अनेक वर्षांपासून एकटे लढत आहेत. मात्र आऊटपूट मिळत नाही. जर इतरांबरोबर गेले तर आऊटपूट मिळेल हे निश्चित आहे. यामुळे राज ठाकरे आज दिल्लीला गेले याचा आनंद मलाही आहे. मी पूर्वीही बोललो होतो, की राज ठाकरे आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे."

उद्धव ठाकरेंवर निशाणा - "तुम्ही कालची सभा बघितली ना, ती I.N.D.I.A. की कोणती आघाडी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची, विचारधारा एक नाहीयेत. म्हणून भाषण करू शकले नाही. बोलू शकले नाही. जे मनात आहे ते मांडू शकले नाही. आता उबाठा गटाचे लोक म्हणणार आहेत का, 'गर्व से कहो हम हिंदू है'? ते 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा देणार आहेत का? नाही दिल्या, नाही करू शकत. त्यामुळे युती होताना तुमची विचारधाराही एक असायला हवी," असा निशाणाही शिरसाट यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर साधला. 

शिरसाट पुढे म्हणाले, "आज राज ठाकरे यांनी जे पाऊल उचलले आहे, ते महत्वाचे आहे. मला वाटते याचा परिणाम महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे बोलले आहेत, की आम्ही 45 क्रॉस करणार आहोत, त्याच्यासाठी हे सपोर्टिंग आहे. फार मोठा सपोर्ट मिळेल. राज साहेब मास लिडर आहेत. म्हणून याचा महायुतीला फायदाच होईल."

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाBJPभाजपा