राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला - आठवले

By Admin | Updated: October 6, 2014 12:55 IST2014-10-06T12:54:38+5:302014-10-06T12:55:15+5:30

माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणा-या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे.

Raj Thackeray made a coal in Nashik - Athavale | राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला - आठवले

राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला - आठवले

>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. ६ - माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणा-या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसे काय देणार असे सांगत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 
लोणावळा येथे भाजप उमेदवारासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी प्रचार सभा घेतली. या सभेत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंचा त्यांच्या शैलीत खिल्ली उडवली. मी बेडुक उड्या मारत नाही तर ढाण्या वाघासारखी उडी मारतो, बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचा टक्कल असे सांगत आठवलेंनी ठाकरेंची खिल्ली उडवली. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत आलो असे आठवलेंनी सांगितले. नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोघेही मुस्लिमविरोधी नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Web Title: Raj Thackeray made a coal in Nashik - Athavale