शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

राज ठाकरेंनी करावं आंदोलनाचं नेतृत्व, पुणतांब्यातील शेतक-यांचं साकडं

By admin | Updated: June 6, 2017 19:07 IST

शेतकरी संपाच्या आंदोलनाला सुरुवात ज्या पुणतांबे या गावातून झाली त्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - शेतकरी संपाच्या आंदोलनाला सुरुवात ज्या पुणतांबे या गावातून झाली त्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं साकडं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी घातलं असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.  
 
पुणतांब्यातील शेतकरी बांधव मुरलीधर थोरात, बबनराव धनवटे, शांतीलाल भाटी, राजेश लुटे, गणेश जाधव आदींनी राज ठाकरेंची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर हे नेतेही उपस्थित होते. या भेटीनंतर राज ठाकरे पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मात्र शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालीच लढा लढवला जाईल, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.    
           
गोदावरी नदीच्या काठी वसलेले व मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेले पुणतांबे हे गाव शेतकरी संपामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. शेतक-यांच्या संपाची सुरूवात याच पुणतांब्यातून झाली. 
 
31 ऑक्टोबरपर्यंत आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी - मुख्यमंत्री
31 ऑक्टोबरपर्यंत गरजू शेतक-यांना कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. तसंच जी कर्जमाफी देऊ ती आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल असंही ते बोलले आहेत. ख-या शेतक-यांशी, शेतकरी नेत्यांशी चर्चा करु, आमचे विरोधक असले तरी चर्चा करु असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. जे ख-या अर्थाने शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्यांच्याशीच चर्चा होऊ शकते. शेतक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणा-यांशी नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. तसंच हिंसक घटनांमागे कोणता पक्ष आहे याची माहिती आहे सांगत पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 
 
"सर्व पक्षांना समोर ठेऊन सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी देणार", असं जाहीरपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. "सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे. 31 ऑक्टोबरपुर्वी महाराष्ट्रातील अडचणीत असलेल्या, गरजू शेतक-यांना कर्जमाफी देणार. यात कोण असावं, कोण नाही, ती कशी असावी यासाठी 4 महिन्यांचा वेळ घेण्यात आला आहे", असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
 
"याआधी कर्जमाफीत घोटाळा झाला असल्याचं कॅगने सांगितलं आहे. त्यामुळेच आयटी बेस सिस्टीम तयार करण्यात येणार आहे", असं मुख्यमंत्री बोलले आहेत. 
 
 
48 तासांत कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू - शेतकरी
दुसरीकडे राज्यात शेतक-यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेलं आंदोलन अद्यापही सुरु आहे. संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त झुगारुन आंदोलक शेतकऱ्यांनी परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कलूप लावलं व आपल्या भावना प्रशासनासमोर मांडल्या.
 
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी किसान क्रांती समन्वय समितीने जिल्ह्यात सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर मंगळवारी शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकून शेतकऱ्यांच्या भावना प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले. 
 
शेतकरी संप : झेड सुरक्षेत मुंबईत आणले दुधाचे टँकर्स-
संपकरी शेतकऱ्यांनी सोमवारी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील शेतक-यांनी पुकारलेल्या संपाची झळ आता शेजारील राज्यांनाही सोसावी लागत असल्याचे दिसत आहे. शेतक-यांच्या संपामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून त्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. 
 
अहमदाबादमध्ये भाजीपाल्यांच्या किंमत गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दुप्पट झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये दुधाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी दुधाचे 27 टँकर्सं झेड श्रेणी सुरक्षेत मुंबईत आणण्यात आले. 
 
शेतकरी संप : सरकारी कार्यालयांना टाळेठोक आंदोलन-
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे.  १ जूनपासून शेतक-यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.  आज शेतक-यांनी टाळेठोक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाद्वारे शेतकरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयानं कुलूप ठोकत आहेत.