शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यातून एकदा राज ठाकरे करणार फेसबुक LIVE; रवींद्र नाटय मंदिरमध्ये केलं जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 13:54 IST

जनतेशी संवाद साधण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आपण फेसबुक पेज सुरु करत आहोत असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.

ठळक मुद्देमनसेमध्ये अनेकजण उत्तम काम करत आहेत, फेसबुक पेजच्या माध्यमातून ती काम तुमच्यासमोर आणणार असल्याचे राज यांनी सांगितले.नतेशी संवाद साधण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आपण फेसबुक पेज सुरु करत आहोत.

मुंबई, दि. 21 - जनतेशी संवाद साधण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आपण फेसबुक पेज सुरु करत आहोत असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. मुंबईत रवींद्र नाटयमंदिरमध्ये राज ठाकरेंच्या फेसबूक पेजचा अनावरण सोहळा सुरु आहे. जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, डॉक्युमेंट्रीज आहे त्या तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी फेसबुक पेज सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

या पेजवरुन राज ठाकरे त्यांची व्यंगचित्रही शेअर करणार आहेत. मनसेमध्ये अनेकजण उत्तम काम करत आहेत, फेसबुक पेजच्या माध्यमातून ती काम तुमच्यासमोर आणणार असल्याचे राज यांनी सांगितले. महिन्यात एकदा आपण फेसबुक लाईव्ह करणार असून, त्यावेळी जनता, कार्यकर्त्यांशी संवाद साधू. त्यांच्या समस्या ऐकू असे राज यांनी सांगितले. 

यापूर्वी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसलेले राज ठाकरे याच पेजचा वापर प्रचारासाठी, स्वत:ची मतं मांडण्यासाठी, सरकारवर टीका करण्यासाठी वापरणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मागील निवडणुकांमधील सततच्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षाची मोट बांधायला सुरुवात केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून या फेसबुक पेजचा वापर केला जाणार आहे. गेल्या काही वर्षात सोशल मीडिया हे प्रचार, प्रसाराचं महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून पुढे येत आहे. निवडणुकीच्या वेळीही सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केला जातो. देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती तसंच राजकीय नेत्यांवर खुलेपणाने टीका करताना आपण सगळ्यांनीच राज ठाकरेंना पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या या फेसबुक पेजवर नेमकं काय पाहायला मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

थेट मेलद्वारे संपर्क करण्याचे राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहनआपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता, असं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं होतं. ठाण्यासह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मनसेला पराभवाची झळ बसल्यानंतर संघटनेत काही बदल करण्याच्या दृष्टीने त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. 

देशात अप्रत्यक्ष आणीबाणी, राज ठाकरेंनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणादेशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी लागू झाल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी यांनीही असाच प्रयत्न केला, तेव्हा जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बहुधा भाजपाला इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य वाटत असावी, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राजकीय फायद्यांसाठी चुकीचे पायंडे पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे