नरेंद्र मोदींनी देशवासीयांचा केसाने गळा कापला, नांदेडमध्ये राज ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:58 IST2019-04-12T19:56:06+5:302019-04-12T19:58:40+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आज  नांदेड येथील सभेमधून जोरदार तोफ डागली.

Raj Thackeray attack on Narendra Modi in Nanded | नरेंद्र मोदींनी देशवासीयांचा केसाने गळा कापला, नांदेडमध्ये राज ठाकरेंचा घणाघात

नरेंद्र मोदींनी देशवासीयांचा केसाने गळा कापला, नांदेडमध्ये राज ठाकरेंचा घणाघात

नांदेड - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आज  नांदेड येथील सभेमधून जोरदार तोफ डागली. नरेंद्र मोदींवर माझा राग आहे. कारण मोदींनी मोठमोठी स्वप्ने दाखवून देशवासीयांचा केसाने गळा कापला, अशा घणाघात राज ठाकरे यांनी केला. 

नरेंद्र मोदी आणि अमित शहांची अघोषित हुकूमशाही मोडून काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील विविध भागात राज ठाकरे सभा नियोजित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिली सभा आज नांदेड येथे झाली. सभेची सुरुवात झाल्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडगोळीने देशावर लादलेल्या आणीबाणीवरून जोरदार आक्षेप घेतला. राज ठाकरे म्हणाले,''माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राग आहे. कारण मोदींनी केसाने गळा कापला. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठी स्वप्ने दाखवली. मात्र ही स्वप्ने खोटी होती.''



आज मोदींची सभा झाली. या सभेत काळे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात आली होती. याचं कारण म्हणजे मोदी बिथरले आहेत. घाबरले आहेत, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.  

Web Title: Raj Thackeray attack on Narendra Modi in Nanded