शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राज्यात पावसाने ओलांडली सरासरी; सप्टेंबरमध्येही धुमशान, २७७ तालुक्यांत शंभरीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 06:47 IST

गेल्या चोवीस तासांपासून विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पावसाने रविवारपासून जाेरदार धडक दिली.

वाशिम/नागपूर/अमरावती : राज्यात सप्टेंबर महिन्यातही पावसाचे धुमशान सुरूच आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरपर्यंतच राज्यातील ३५५ पैकी २७७ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.  हवामान विभागाच्या अहवालानुसार, ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ पैकी तब्बल २७७ तालुक्यांत शंभर टक्क्यांहून अधिक, तर ७२ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांपासून विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पावसाने रविवारपासून जाेरदार धडक दिली. ही संततधार साेमवारीही कायम हाेती. नागपूर, गडचिराेली, गाेंदिया, भंडारा, यवतमाळ, अमरावती, वर्धा या विदर्भातील सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात ११ तारखेपर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७५.६० टक्के पाऊस पडला असला, तरी १ जून ते ११ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २७७ तालुक्यांत १ जूनपासून १ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.

येथे पडला सरासरीहून अधिक पाऊसशंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस असलेल्या २४९ तालुक्यांत नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी तालुक्यातील १६, नागपूर, चंद्रपूर आणि पुणे  जिल्ह्यातील प्रत्येकी १४, नाशिक, अहमदनगर प्रत्येकी १३, गडचिरोली जिल्ह्यातील १२, सोलापूर, सांगली, लातूर आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी १०, सातारा, औरंगाबाद आणि बीडमधील प्रत्येकी ९, जालना आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी ८, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद, बुलडाणा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी ७, पालघर, जळगाव, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी ५, वाशिम ४, ठाणे आणि अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी ३, रत्नागिरी, धुळे आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी २, तर नंदूरबार जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे. 

६ तालुके तहानलेलेच सहा तालुक्यांत अद्यापही पावसाचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात रत्नागिरी संगमेश्वर, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तर कोल्हापुरातील चांदगड, राधानगरी आणि बावडा या तीन तालुक्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊस