शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

विदर्भात पावसाचा जोर कमी

By admin | Updated: July 18, 2014 00:44 IST

दमदार पावसासाठी पाच ते सहा दिवसांची प्रतीक्षा

अकोला : पश्‍चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गत तीन दिवसांत विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली; परंतु पाऊस प्रणाली पुन्हा अशक्त झाली असून, सार्वत्रिक पावसाचे ढग उत्तर-पूर्वेकडे वळल्याने, विदर्भातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे आता सार्वत्रिक पावसासाठी आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी मात्र येतच राहतील.गत सोमवारपासून ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. परिणामी छत्तीसगड व विदर्भात तीन दिवस दमदार पाऊस पडला; परंतु आता हे पावसाचे ढग उत्तर-पूर्वेकडे वळले आहेत. सध्या पूर्व मध्य प्रदेशावर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. विदर्भात पाऊस येण्यासाठीची जी पाऊस प्रणाली आहे, ती यामुळे अशक्त झाली आहे. पाऊस प्रणाली साधारणत: दर आठ दिवसांनी विकसित होत असते. त्यामुळे आता पावसासाठी आणखी पाच ते सहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे भाकीत, नागपूर वेधशाळेने वर्तविले आहे.दरम्यान, गेल्या चोवीस तासांत, विदर्भातील हिंगणा येथे १८ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली असून, कळंबेश्‍वरला १६ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. उमरेड येथे १५, चिमूरला १२, तर सावनेर, समुद्रपूर, नागपूर, भिवापूर, परसेओणी व कुही येथे प्रत्येकी ११ सेंटिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. तूमसरला १0, वर्धा, खारंचा व सेलू या ठिकाणी प्रत्येकी ९, तर हिंगणघाट, तिवसा, मोहाडी, आर्वी व आष्टी येथे प्रत्येकी ७ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. रामटेक व सालेकसा येथे प्रत्येकी ६ सेंटिमीटर, तर मौदा, चिखलदरा, अमरावती, तिरोरा, मोर्शी, आमगाव व धामणगाव रेल्वे येथे प्रत्येकी ५ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धारणी, गडचिरोली, देवळी, चांदूर रेल्वे, पिनी, वरोरा, चांदूर बाजार, आकोट व सिंदेवाही या ठिकाणी ४ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. मारेगाव, परतवाडा, देऊळगाव राजा, कामठी, गोरेगाव, राळेगाव, अर्जुनी-मोरगाव, बाभूळगाव, वरूड, आरमोरी, गोंदिया, लोणार, मेहकर, यवतमाळ, भद्रावती व चार्मोशी येथे ३ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अंजनगाव, सडक अर्जुनी, बटकुली, भंडारा, देवरी, वणी, कोपर्णा, कुरखेडा, ब्रम्हपुरी, आमरागड, धानोरा, मुल, लाखांदूर, साकोली, नांदगाव काझी, देसाईगंज, झरी झामणी, दर्यापूर व जोईली येथे २ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेल्हारा, चंद्रपूर, घाटंजी, कळम, बल्लारपूर, नेर, मुर्तिजापूर, राजूरा, रिसोड, जळगाव जामोद, संग्रामपूर, अहेरी, शेगाव, गोंड पिपंरी, अकोला, दिग्रस, सिंदखेड राजा, लाखणी, वाशिम, पोमभूर्ण, धारवा नागभिड, व अरणी येथे प्रत्येकी १ सेंटिमीटर पावसाची नोंद वेधशाळेने केली आहे.