औरंगाबाद : केबीसी कंपनीच्या फसवणूक प्रकरणात नाशिकचे पथक गुरुवारी दुपारी 4 वाजता पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. सकाळपासून त्यांची वाट पाहत असलेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी त्यांची भेट घेऊन तक्रारींचा पाऊसच पाडला. तक्रारदारांची संख्या अधिक असल्याने पोलिसांनी प्रत्येक गुंतवणूकदाराकडून एक फॉर्म भरून घेतला.
नाशिक येथील केबीसी प्रा.लि. या कंपनीने साडेतीन वर्षात अडीच पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. यात मराठवाडय़ातील आणि विशेषत: औरंगाबाद जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची संख्या मोठी असल्याचे समोर आले. या प्रकरणी कंपनीचे संचालक भाऊसाहेब छबू चव्हाणसह 1क् जणांविरोधात नाशिकच्या आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी यातील 8 जणांना अटक केली. प्रमुख आरोपी भाऊसाहेब चव्हाण हा पत्नीसह फरार झाला आह़े याबाबतची माहिती मिळताच औरंगाबादेतील अनेक गुंतवणूकदार नाशिक येथे जाऊन तक्रारी करू लागले.
त्यांचा त्रस टाळण्यासाठी नाशिक येथील आडगाव पोलीस ठाण्याचे एक पथक गुरुवारी दुपारी औरंगाबादेत आले. केबीसी कंपनीने दिलेले धनादेश, प्रमाणपत्र आणि गुंतवणूक रकमेच्या पावत्या तक्रारदारांनी सोबत आणल्या होत्या. तक्रारींसोबत त्यांनी त्या पोलिसांना दिल्या. (प्रतिनिधी)
कार्यवाही उशिरार्पयत सुरू
गुंतवणूकदारांनी किती रक्कम कोणत्या एजंटमार्फत आणि कोठे गुंतविली याबाबतची प्रश्नावली असलेले फॉर्म पोलीस आयुक्तालयातील आíथक गुन्हे शाखेने तयार केले होते. शहर पोलिसांनी गुंतवणूकदारांकडून हे भरून घेतले. अशाच आशयाचे फॉर्म नाशिक येथून आलेल्या पोलीस पथकाने सोबत आणले होते. या पथकानेही गुंतवणूकदारांचे फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही सुरू केली. त्यांची ही कार्यवाही उशिरार्पयत सुरूच होती.