मुंबई : राज्यातील कमाल तापमान वाढीचा विपरित परिणाम आणि हवामानातील स्थानिक बदलामुळे पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.राज्यातील प्रमुख शहरांच्या कमाल तापमानाने कहर केला असून, विदर्भातील शहरांचे कमाल तापमान ४२ अंशावर गेले आहे. शिवाय मुंबईच्या कमाल तापमानातही सरासरी १ अंशाची वाढ नोंदविण्यात येत असून, येथील आर्द्रतेमध्ये वाढ झाल्याने ऊकाडा कमालीचा वाढला आहे. परिणामी मुंबईकर घामाघूम होत आहेत. मागील चोविस तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा वादळी पाऊस पडला. (प्रतिनिधी)अंदाज : ७-८ मे : संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ९-१० मे : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.इशारा : १० मे : विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुंबई अंदाज : ७ मे : आकाश अंशत: ढगाळ राहील. ८ मे : आकाश मुख्यत: निरभ्र राहील.
हवामान बदलामुळे पावसाचा धिंगाणा
By admin | Updated: May 7, 2015 11:32 IST