शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हरभजनही सामना जिंकून देतो रे! : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 05:49 IST

‘आज माझी खूप अवघडल्यासारखी परिस्थिती झाली आहे़ क्रिकेटच्या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीनंतर हरभजनसिंग बॅटिंगला आला आहे. आता त्याची बॅटिंग कोण पाहणार तसे माझे झाले आहे’, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हणताच ‘अरे धनंजय, कधी कधी हरभजनसिंगही सामना जिंकून देतो रे. 

राहुरी(जि. अहमदनगर) : ‘आज माझी खूप अवघडल्यासारखी परिस्थिती झाली आहे़ क्रिकेटच्या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीनंतर हरभजनसिंग बॅटिंगला आला आहे. आता त्याची बॅटिंग कोण पाहणार तसे माझे झाले आहे’, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हणताच ‘अरे धनंजय, कधी कधी हरभजनसिंगही सामना जिंकून देतो रे. त्यामुळे तू बिनधास्त बॅटिंग कर’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांना धीर दिला.झाले असे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेस गुरुवारी श्रीगोंदा येथून प्रारंभ झाला़ त्यानंतर शेवगाव येथील सभा झाल्यानंतर राहुरी येथील शेवटच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते पोहोचले होते. सायंकाळी असलेल्या सभेला विलंब होऊ लागल्याने विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थेट व्यासपीठावरच आले आणि भाषणाला सुरुवात केली. मोटारसायकल रॅली संपवून धनंजय मुंडे सभास्थळी आली तेव्हा पवार यांचे भाषण सुरु होते.हरभजनची बॅटिंग कोण पाहणार : भाषणाला उभे राहिलेले मुंडे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते यांनी भाषण केल्यानंतर मी बोलणे पक्षशिस्तीत बसत नाही. विराट कोहलीची बॅटिंग झाल्यानंतर हरभजन सिंगची बॅटिंग कोण पाहणार? असा मिष्किल सवाल मुंडे यांनी केला. त्यावर ‘कधी कधी हरभजन सिंग सुद्धा सामना जिंकून देतो, तू बिनधास्त भाषण कर’, असा सल्ला अजित पवारांनी दिला आणि मग आपल्या नेहमीच्या शैलीत सरकारविरुद्ध जोरदार बॅटिंग करीत मुंडेंनी सभा जिंकली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार