शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी, ढगांच्या गडगडाटासह रेकॉर्ड ब्रेक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:06 IST

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी 2 .30 वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गड़गडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाला प्रारंभ होतानाच सिंधुदुर्गात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.त्यामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. तर पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.

कणकवली, दि. 10 - कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी 2 .30 वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गड़गडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाला प्रारंभ होतानाच सिंधुदुर्गात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.त्यामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. तर पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.अनंत चतुर्दशीनंतर गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कड़कडाटासह पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी पुन्हा उष्णतेचे प्रमाण वाढले होते . तसेच एवढ़्यातच ऑक्टोबर हिटची चाहुल लागायला लागली आहे.रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भागातहि पाऊस झाला. सायंकाळी 5 वाजल्यानंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी तुरळक सरी अधून मधून कोसळत होत्या. त्यामुळे सतरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात भाविकाना अडचण निर्माण झाली होती.दुपारनंतर पडलेल्या या जोरदार पावसाने कणकवली तालुक्यात कुठेही नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरा पर्यन्त कणकवली येथील तहसील कार्यालयात करण्यात आलेली नव्हती. सिंधुदुर्गात पावसाने गडगडाटासह दमदार हजेरी लावली. काही ठीकाणी झाडाच्या फांद्या विज वाहिन्यांवर तुटून पडल्याने विज गायब झाली होती. तर ढगाळ वातावरण असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. कुडाळमध्येही विजांच्या कडकडाटासह सह पावसाची हजेरी लावली. ⁠⁠⁠⁠⁠सावंतवाड़ी तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळला. विजेचा लपंडाव सुरु असल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला होता.देवगड तालुक्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. तसाच ढगांचा कडकडाटही सुरु होता. हा पाऊस भात शेतीला फ़ायदेशीर ठरणार का? याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांकडून भात चिम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.