शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

Rain in Diwali: दिवाळीही पावसात भिजणार; उष्ण लाटांमुळे रेंगाळली परतीच्या पावसाची पावले 

By रूपेश उत्तरवार | Updated: October 14, 2022 06:37 IST

राज्यातून पाऊस १५ ऑक्टोबरनंतर परत जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे काढणीला आलेले पीक भुईसपाट होत आहे.

- रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाचे गणित २०१० पासून बिघडले आहे. साधारणत: १७ सप्टेंबरला राजस्थानातून माघारी फिरणारा पाऊस यंदा २३ सप्टेंबरपासून माघारी फिरत आहे. मात्र, उष्ण लाटांमुळे राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे. 

राज्यातून पाऊस १५ ऑक्टोबरनंतर परत जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे काढणीला आलेले पीक भुईसपाट होत आहे. शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामातील पेरणीच्या तारखाही बदलाव्या लागतील, असे मत हवामान अभ्यासक नोंदवीत आहेत. 

दिवाळीतही पाऊसमुंबई : परतीच्या पावसाचे वेध लागले असताना मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. शनिवारनंतर पाऊस थांबणार असला तरी दिवाळीदरम्यान २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.१४ ऑक्टोबर - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर (यलो अलर्ट)१५ ऑक्टोबर - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (यलो अलर्ट)१६ आणि १७ ऑक्टोबर - संपूर्ण महाराष्ट्र (ग्रीन अलर्ट)

पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रात मोठे बदलपृथ्वीवरील तापमानात सतत वाढ होत आहे. पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. यातून हवामानात मोठा बदल होत आहे. कमी दाबाचे पट्टे वारंवार तयार होतात. वातावरणात भोवऱ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने ढगफुटीसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातून नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

दहा वर्षांत कधी परतला पाऊस?वर्ष     तारीख२०१०     ११ ऑक्टोबर२०११     १३ ऑक्टोबर२०१२     १५ ऑक्टोबर२०१३     १९ ऑक्टोबर२०१४     १४ ऑक्टोबर२०१५     १५ ऑक्टोबर२०१६     १८ ऑक्टोबर२०१७     २९ ऑक्टोबर२०१८     १८ ऑक्टोबर२०१९     १२ ऑक्टोबर२०२०     १९ ऑक्टोबर२०२१     २० ऑक्टोबर२०२२     अजून अनिश्चित 

टॅग्स :Rainपाऊस