शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे स्त्रीदाक्षिण्य संपले, लेडीज स्पेशल डबे काढले; प्रतिसाद नसल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 09:40 IST

महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न तीव्र

सांगली : कोरोनानंतर उत्पन्नावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केलेल्या रेल्वेने तोट्यातील अनेक उपक्रम बंद केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एक्स्प्रेस गाड्यांचे लेडीज स्पेशल डबेही काढून टाकले आहेत. महिलांना प्रवासासाठी स्वतंत्र डबा मिळत नाही. देशभरातील मेल व एक्स्प्रेस गाड्यांसाठी हा निर्णय लागू केला आहे. गाडीला सर्वांत शेवटी गार्डच्या डब्यालगत लेडीज स्पेशल डबा असायचा. एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना त्याचा मोठा आधार होता. शिवाय अन्य डब्यांतील गर्दीमध्ये जागा न मिळालेल्या महिला प्रवासीही लेडीज स्पेशल डब्याचे आरक्षण घेऊन प्रवास करायच्या. दिवसा धावणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये या डब्यांना विशेष गर्दी असायची. रात्री मात्र बहुतांश रिकामेच असायचे.

लॉकडाऊननंतर रेल्वेने तोट्यातील उपक्रमांचा आढावा घेतला, त्यामध्ये रिकाम्या धावणाऱ्या लेडीज स्पेशल डब्यांवरही संक्रांत आली. सध्या सर्व मेल व एक्स्प्रेसचे हे डबे काढून टाकले आहेत. फक्त दिव्यांगांसाठीचा अर्धा डबा शिल्लक ठेवला आहे. महिलांचा अल्प प्रतिसाद आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण यामुळे लेडीज स्पेशल डबा बंद केल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. लांब पल्ल्याच्या प्रवासात महिला सहसा एकटीने रेल्वेत येत नाहीत, पुरुष सोबत्यासोबत सर्वसामान्य डब्यातच बसतात. महिलांसाठीच्या डब्यात गुन्हेगारी कृत्येही वारंवार होत असत. यामुळेच हे डबे बंदचा निर्णय रेल्वे बोर्डाला घ्यावा लागला.

महिलांसाठी एक कुपे राखीवमेल व एक्स्प्रेस गाड्यांचा लेडीज स्पेशल डबा बंद केला असला तरी स्लीपर डब्यातील आठ आसनांचा एक कुपे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आरक्षण फॉर्ममध्ये महिलांनी या कुपेसाठी विनंती केल्यास आसन प्राधान्याने दिले जाते.

कोयना एक्स्प्रेस होती लोकप्रियकोल्हापूर ते मुंबईदरम्यान दिवसा धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसमधील लेडीज स्पेशल डब्यांना मोठा प्रतिसाद होता. त्यांचे आरक्षण बारमाही फुल्ल असायचे; पण हे डबेदेखील काढून टाकले आहेत. सध्या राज्यात फक्त मुंबईतील लोकल गाड्यांनाच लेडीज स्पेशल डबे आहेत.