शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने ठेवला मृत कामगारांवरच ठपका; समितीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:58 IST

जालन्याजवळ रुळावर झोपलेल्या १३ जणांचा झाला होता मृत्यू

- शिवराज बिचेवार नांदेड : लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडल्याने गावाकडे जात असताना बदनापूरजवळ पहाटे रुळावर झोपलेल्या १३ कामगारांना रेल्वेने चिरडल्याची घटना ८ मे रोजी घडली होती. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने या अपघाताचा ठपका कामगारांवरच ठेवला आहे. स्वत:च्या मृत्यूस त्यांचाच नष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.जालना येथील दोन कंपन्यांमध्ये परप्रांतीय मजूर होते. या मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कंपनीने केली होती. परंतु त्यानंतरही हे कामगार गावी परतण्याच्या ओढीने ७ मे रोजी पायीच जालना येथून निघाले. रस्त्यातील चेक पोस्ट आणि पोलिसांची नजर चुकविण्यासाठी त्यांनी रेल्वे रुळावरूनच चालण्याचा निर्णय घेतला होता. पायी चालून हे सर्व पहाटे बदनापूरजवळ पोहोचले. थकल्याने त्यांनी रुळावरच पाठ टेकविली.गाढ झोपेमुळे रेल्वेचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. रेल्वे अंगावरून गेल्याने १३ जणांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.या समितीचे अध्यक्ष उपविभागीय दंडाधिकारी केशव नेटके होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. व्ही. खरात आणि सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड हेही समितीत होते.मयत कामगारांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानमयत कामगारांच्या वारसांना शासनाने पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने मानवीय दृष्टिकोनातून या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरविले असल्याचेही त्यात नमूद आहे.समितीने दिलेला अहवालकामगारांची व्यवस्थापनाने जेवणाची, राहण्याची सोय केली होती. तसेच मूळ गावी जाण्यासाठी कामगारांनी बस, रेल्वेची व्यवस्था यासाठी कुठलाही ऑनलाईन परवाना काढला नव्हता. प्रशासनाची परवानगी घेतली नाही, तसेच कंपनी व्यवस्थापन, ठेकेदार यांना कोणतीही माहिती न देता किंबहुना प्रशासनाची नजर चुकवून रुळावरून चालत गेले. रुळावर झोपणे या कृतीस कामगारच जबाबदार आहेत.