शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सावंतवाडीत रेल्वे टर्मिनस

By admin | Updated: January 5, 2015 00:57 IST

सुरेश प्रभू यांची घोषणा : रेल्वेसाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ

रत्नागिरी : रेल्वेमंत्री म्हणून कोकणवासीयांच्या सर्व समस्या दूर करण्यास मी कटिबद्ध आहे. सावंतवाडीत रेल्वे टर्मिनस उभारले जाईल. राज्यातील रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य व केंद्राच्या सहभागातून एक स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या आठवड्यात तपशीलवार चर्चा होईल व त्याबाबत संयुक्तपणे प्रसारमाध्यमांसमोर घोषणा होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोकण रेल्वेत कोकण कुठे आहे, असे नेहमी विचारले जाते. अनेक समस्या येथे आहेत. प्रवाशांसाठी खूप काही करता येण्याजोगे आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात कोकण रेल्वेबाबतच्या समस्या सुटल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कोकण रेल्वेच्या समस्या सोडविण्याबाबत कॉँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे आज आंदोलन केले. माझा त्यांना सवाल आहे की, गेल्या दहा वर्षांच्या काळात त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्रात युपीएचे सरकार होते, त्यावेळी सर्व कामे केली असे म्हणता, मग या समस्या राहिल्या कशा? तुम्हाला तुमचे सरकार असताना समस्या सोडविता आल्या नाहीत, आता मोदींचे सरकार आले आहे. या सर्व समस्या आम्ही सोडविणार आहोत. कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कोकण रेल्वेचे रखडलेले प्रकल्प सुरू केले जातील. कोणतेही नवीन लघू प्रकल्प कोकण रेल्वेला स्वतंत्रपणे उभारता यावेत यासाठी तीस कोटींपर्यंतच्या खर्चाचे प्रकल्प कोकण रेल्वे स्वत: मंजूर करू शकेल. तसे अधिकार कोकण रेल्वेला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. (पान ८ वर)रेल्वेला दुष्टचक्रातून बाहेर काढणारदररोज तीन कोटी प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेणारी भारतीय रेल्वे ही देशाची मोठी संस्था आहे. मात्र, या ना त्या प्रकारे गेल्या काही वर्षांत रेल्वेवर अत्याचार झाले. आज जेवढे उत्पन्न तेवढाच खर्च अशी रेल्वेची स्थिती असून, नवीन प्रकल्प राबवायचे कसे, प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा द्यायच्या कशा? रेल्वेचे अनेक प्रकल्प केवळ सुरुवात होऊन ठप्प झाले आहेत. त्यामुळेच रेल्वेला या दुष्टचक्रातून बाहेर काढले जाईल व देशवासीयांना रेल्वेच्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील, असे प्रभू यांनी सांगितले. प्रभू म्हणाले....‘सेफ्टी आॅडिट ’करुसुरक्षा व्यवस्थेत सुधारणा. ४कोकम सरबतसह कोकणची उत्पादनेही रेल्वे स्थानकांवर.रेल्वेची सर्व स्थानके स्वच्छ ठेवणार.अन्य देशांप्रमाणे रेल्वेचे डबे अत्याधुनिक. रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांना ‘टुरिस्ट गाइड’ म्हणून प्रशिक्षित करणार.प्रवाशांसाठी देशभर ‘हेल्पलाईन’ सुरू