शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

भारतात धावणार अतिवेगवान रेल्वे !

By admin | Updated: August 21, 2016 22:51 IST

रेल्वे तासाभरात सहाशे किलोमीटर अंतर पार करू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. 21- रेल्वे तासाभरात सहाशे किलोमीटर अंतर पार करू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित केलेल्या मायग्रोव्ह या जगातील सर्वात मोठ्या कंपनीशी केंद्र सरकारची लवकरच नवी दिल्लीत चर्चा होणार आहे. या तंत्राद्वारे भारतीय रेल्वेतही क्रांती घडविता येईल व शेकडो किलोमीटरचे अंतर काही मिनिटात पार करता येईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात रविवारी दुपारी १ वाजता रेल्वे संशोधन केंद्राचे मंत्री प्रभू यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कोकण रेल्वेचे चेअरमन संजय गुप्ता, विद्यापीठाचे रजिस्ट्रार एम.ए.खान, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर आदी उपस्थित होते. प्रभू म्हणाले, दिडशे वर्षापासून रेल्वेसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान यापुढे कालबाह्य ठरणार आहे. सर्वाधिक वेगवान रेल्वेचा प्रयोग चिनने याआधी केला होता. मात्र आता त्यापेक्षाही वेगवान म्हणजेच ५५० ते ६०० किलोमिटर प्रतितास वेगाने रेल्वे धावू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान भारतीय रेल्वेतही वापरून वेगाबाबत क्रांती घडवून आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना २ सप्टेंबरला दिल्लीत चर्चेसाठी बोलावले आहे. कोकण रेल्वे आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहयोगातून रेल्वेने सुरू केलेल्या रेल्वे अभियांत्रिकी संशोधन केंद्राचे झालेले उदघाटन हे भारतीय रेल्वेतील एक नवे पर्व आहे. या केंद्रात कोकणातील अनेक युवक, युवतींना रेल्वेशी निगडीत अनेक विषयांवरील संशोधन करण्याचे कोर्स सुरू पूर्ण करता येतील. त्यांच्यासाठी रेल्वेतच नोकरीची संधीही मिळू शकेल. त्याचा फायदा कोकणवासियांनी घ्यावा, असे ते म्हणाले. रेल्वे संशोधन केंद्राच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय देशमुख म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाने रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी देशातील ६७९ विद्यापीठांमधून मुंबई विद्यापीठाची केलेली निवड हा एक ऐतिहासिक क्षण आहे. रेल्वे प्राधिकरणाच्या मदतीने रेल्वे संदर्भातील व्यवस्थापन, कुशल मनुष्यबळ अशा सर्व प्रकारच्या गरजांवर आधारीत सर्व प्रकारचे अभ्यासक्रम या संशोधन केंद्रात सुरू करण्यात येतील. या कार्यक्रमापूर्वी मंत्री प्रभू यांच्या हस्ते संशोधन केंद्राच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. रेल्वे-विद्यापीठ समन्वयाचा अभावरेल्वेच्या संशोधन केंद्राच्या कार्यक्रमात कोकण रेल्वे महामंडळाचे चेअरमन संजय गुप्ता हे व्यासपीठासमोरील महत्वाच्या व्यक्तींच्या रांगेत बसले होते. मात्र भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी त्यांना नंतर व्यासपीठावर बोलावले. रेल्वेच्या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे चेअरमन व्यासपीठावर नसणे ही अयोग्य बाब होती. त्यामुळे कार्यक्रमाबाबत रेल्वे व विद्यापीठ यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून आला. लवकरच रेल्वेचे विद्यापीठदेशात रेल्वेचे स्वत:चे अभियांत्रिकी संशोधन विद्यापीठ हवे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने प्रथम संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक ती तयारी रेल्वेकडून केली जात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचे स्वत:चे विद्यापीठ येत्या काही कालावधीत स्थापन होईल, असे मंत्री प्रभू म्हणाले.