शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कमध्ये लवकरच ६,७२२ किलोमीटरची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:03 IST

राज्यात ८७,००० कोटी रुपयांच्या ३९ रेल्वे प्रकल्पांचे काम सुरू

- नितीन अग्रवालनवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊननंतर रेल्वेने पुन्हा गती घेतली असून, महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कमध्ये लवकरच ६,७२२ किलोमीटरची वाढ होणार आले. राज्यात ३९ प्रकल्पांवर काम सुरू असून, यापैकी १०२६ किलोमीटरची वाहतूकही सुरू करण्यात आलेली आहे.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, राज्यातील योजनांवर सुमारे ८७,००० कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. यात १६ नवीन लाइन, ५ वर रुंदीकरण व १८ मध्ये दुहेरी लाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी उघडल्या गेलेल्या १०२६ किलोमीटर रेल्वेलाइनसह या योजनांवर मागील वर्षी मार्च २०२० पर्यंत १७,८४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी केलेल्या उपायांबाबत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात गोयल म्हणाले की, प्रकल्पांची प्राथमिकता, निधीच्या वाटपात वाढ, फिल्ड स्तरावर अधिकारांचा वापर, प्रकल्पांवर बारकाईने सतत देखरेख, भूमी अधिग्रहण व वनसंबंधी परवानगीचे काम लवकरात लवकर केले जात आहे. देशभरात ७.५लाख कोटी रुपयांच्या एकूण ५३,०३९ किलोमीटरच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. 

यातील ५१३ योजनांपैकी १८९ नव्या रेल्वेलाइन, ५४ रुंदीकरण व २७० किलोमीटरचे दुहेरीकरण सुरू आहे. यावर मागील वर्षी मार्चपर्यंत १.८६ लाख कोटी खर्च झाले व १०,०१३ किलोमीटरच्या लाइन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या.१२६६.८ किलोमीटर प्रकल्पांत राज्याची भागीदारीलोकसभेत गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील १२६६.८ किलोमीटर लांबीच्या ९ रेल्वे प्रकल्पांत राज्य सरकारची भागीदारी आहे. यातील २८४ किलोमीटरच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड व २६१ किलोमीटरची अहमदाबाद-बीड-परळी वैजनाथ नवी रेल्वेलाइन व ११६ किलोमीटरच्या नागपूर-नागभीरचाही समावेश आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे