शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

एलफिन्स्टन रेल्वे पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दिली होती परवानगी, मात्र टेंडर अडकला लालफितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 22:19 IST

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती. मात्र त्याचे टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देएलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती.टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक हरिश प्रभू यांनी मुंबईतून ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.

मुंबई, दि. 29 - एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती. मात्र त्याचे टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक हरिश प्रभू यांनी मुंबईतून ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याआधीच पुलाच्या बांधकामास परवानगी दिली होती, मात्र रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्याचे टेंडर निघू शकले नाही, अशी नवी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 23 एप्रिल 2015 रोजी एलफिस्टन येथे ‍12 मीटर रुंद आणि 10 मीटर लांब इतक्या आकाराचा पूल बांधण्यास मंजुरी दिली होती. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या संदर्भातला पत्रव्यवहार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत केला होता.एलफिस्टन येथील पादचा-यांच्या समस्या लक्षात घेऊन हा रेल्वे ब्रिज वाढवण्याची आवश्यकता आहे, याकडे लक्ष्य वेधले असता त्यावेळी सुरेश प्रभूंनी बांधकामासाठी मंजुरी दिली होती. या पुलाच्या बांधकामासाठी 11.86 कोटी रुपये मंजूरही करण्यात आले. मात्र त्यानंतर ही मंजुरी सरकारी लालफितीत अडकली. रेल्वे प्रशासनाने या फाईलकडे वा रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीकडे कानाडोळा केल्यानं या पुलाचे टेंडर निघाले नाही. रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा यास जबाबदार असल्याचीच माहिती सुरेश प्रभू यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जर तेव्हाच या मंजूर फाईलवर त्वरित कारवाई करण्यात आली असती आणि या पुलाचे कंत्राट काढण्यात आलं असत तर आज मुंबईमध्ये ही परिस्थिती उद्भवली नसती आणि विनाकारण 22 माणसांचा मृत्यू झाला नसता. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे या दुर्घटनेत 22 जणांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. तर 39 जण जखमी झालेत. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10.45  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. तर एका व्यक्तिच्या सांगण्यानुसार प्रचंड गर्दीच्यावेळी एक माणूस काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकला असता, मागच्या लोंढ्यामुळे तो ढकलला गेला व पडला. यानंतर त्याठिकाणी मागच्या लोंढ्यांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती खूपच बिकट झाली होती.