शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

वाशिंद रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा रेलरोको; दादर-अमृतसर एक्स्प्रेस 35 मिनिटं धरली रोखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 11:23 IST

रेल्वे सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.

ठळक मुद्देरेल्वे सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. शुक्रवारी सकाळी रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झालेला पाहायला मिळतो आहे.संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेलरोको केल्याची माहिती मिळते आहे.

मुंबई, दि. 1- नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मंगळवारी रुळावरूंन घसरल्याची घटना आसनगाव स्थानकाजवळ घडली होती. 72 तासांपासून टिटवाळा-आसनगाव रेल्वेसेवा बंद आहे. रेल्वे सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. कसारा, आसनगावमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना मुंबईत कामावर हजर राहणं शक्य होत नाहीये. याकारणामुळे शुक्रवारी सकाळी रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेलरोको केला होता. पण काही वेळानंतर हा रेलरोको मागे घेण्यात आला आहे. पोलिसांनी आता आदोलनकर्त्या प्रवाशांता रेल्वे रूळावरून बाजूला केल्याची माहिती मिळते आहे. वाशिंद स्टेशनवर संतप्त प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्सप्रेस तब्बल 35 मिनिटं रोखून धरली होती. तसंच रेल्वे सेवा कधी पूर्वपदावर येणार? अशी विचारणा काही प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे केली. तीन दिवसांपासून बंद असलेली सेवा पूर्वपदावर यायला अजून आठ दिवस तरी लागतील, असं उत्तर या संतप्त प्रवाशांचा देण्यात आल्याचं समजतं आहे. दरम्यान, लोकलसेवा लवकरात लवकर पूर्ववत करा, अशी मागणी रेलरोको करणाऱ्या प्रवाशांकडून केली जाते आहे. 

सध्या कसारा ते टिटवाळा हा मार्ग बंद असला तरी टिटवाळ्याहून कसाराकडे जाणारा मार्ग सुरु आहे. या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात असून प्रवाशांच्या सोयीसाठी या एक्स्प्रेसना प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. मात्र मुंबईकडे येण्यासाठी पर्याय नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष आहे. 

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मंगळवारी रुळावरूंन घसरल्याची घटना आसनगाव स्थानकाजवळ घडली. यामुळे रेल्वे रूळ आणि ओवरव्हेड वायरचे मोठं नुकसान झालं. रुळांवर मोठय़ा प्रमाणात चिखल आल्याचे पाहून गाडीच्या लोको पायलटने एमजर्न्‍सी ब्रेक लावला व त्यामुळे मोठा अपघात टळल्याचेदेखील ते म्हणाले. बुधवारी रात्री डाऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण अप मार्गावर सतत चिखल येत असून या मार्गावरील वाहतुक सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा तरी कालावधी लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण तीन उलटूनही लोकलसेवा सुरू न झाल्याने संतप्त प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी रेलरोको केला आहे.  

दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने टिटवाळा- कसारा मार्गावरील लोकल ट्रेनची वाहतूक बंद आहे. या मार्गावर सध्या टिटवाळापर्यंतच लोकल ट्रेन सुरु आहेत. मंगळवारी सकाळी आसनगाव- वाशिंददरम्यान नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. त्यामुळे कसारा- टिटवाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यापाठोपाठ मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपल्याने मध्य रेल्वे खोळंबली.टिटवाळा- कसारा मार्गावर रेल्वेच्या पथकाला अपघातग्रस्त दुरांतो एक्स्प्रेसचे डबे हटवण्यात यश आलं होतं. ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे डबे हटवण्यात आलं. डबे हटवण्यात आले असले तरी या मार्गावर अजूनही ओव्हरहेड वायर आणि अन्य तांत्रिक कामे बाकी आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळीदेखील टिटवाळा- कसारा मार्गावरील लोकल सेवा बंद होती. वाहतूक ठप्प असल्याने कसारा, आसनगाव येथे राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे