शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नाणारवरून रायगडमध्येही राजकीय वातावरण गरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 04:00 IST

भू-संपादनास शेकापचा विरोध : शिवसेना जनतेबरोबर

- आविष्कार देसाई अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी सरकारने नव्याने भूसंपादन केल्यास त्याला आमचा विरोध राहील, मात्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे तेथे प्रकल्प उभारल्यास आमची हरकत राहणार नाही, असे मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.तर शिवसेना या प्रकल्पाविरोधात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्द्यावर रायगडात आगामी काळात आंदोलन पेटून त्याचे चटके मात्र भाजपला बसणार असल्याचे बोलले जाते. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर देत ही माहिती दिली. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहकार्याने तीन लाख कोटी रुपयांचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता, परंतु शिवसेनेने नाणारला प्रखर विरोध केला होता.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली. प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास ४० गावातील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नसल्याचेही ते म्हणाले. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, शेती यासह निसर्गाची प्रचंड हानी होणार असल्यामुळे नाणारवासीयांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध होता. शिवसेनेनेदेखील कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध असल्याचे दाखवून दिले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना हा प्रकल्प नको होता तीच परिस्थिती रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे जनतेच्या विरोधासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. आमचा या प्रकल्पाला विरोध राहील असे शिवसेनेचे महाड विधानसभा क्षेत्राचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.महाडमध्ये प्रकल्प उभारण्याची मागणीनाणारमधील प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात स्थलांतरित होणार असल्याने शेकापकडून या प्रकल्पाला कडाडून विरोध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. रायगड जिल्ह्यात प्रकल्प आणत असताना नव्याने भूसंपादन करायला आमचा विरोध राहील. कारण या आधीच विविध प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केलेली आहे. महाड तालुक्यातील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. तेथे प्रकल्प उभारावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प