शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी विद्यापीठ ठरला राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक विजेता, मुंबई विद्यापीठ तिसऱ्या स्थानी      

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:33 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक क्रिके ट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संघ विजेता, तर नागपूर येथील मत्स्य व पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू) उपविजेता ठरला.

अमरावती  -  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक क्रिके ट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संघ विजेता, तर नागपूर येथील मत्स्य व पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू) उपविजेता ठरला. मुंबई विद्यापीठ संघाला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.     महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतर कुलगुरू चषक टी-२० स्पर्धेला अमरावती विद्यापीठात ६ जानेवारीपासून प्रारंभ झाला. यात राज्यातून १५ विद्यापीठ संघाने सहभाग नोंदविला होता. रविवारी अंतिम सामना नागपूरच्या माफसू आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकून राहुरी विद्यापीठ संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० षटकांत २१३ धावांचा डोंगर उभा केला. विकास धनवटे याने ५८, तर सतपाल गायकवाड ९६ यांनी सर्वाधिक धावला काढल्या. त्यानंतर नागपूर माफसूने २१३ धावांचे आव्हान स्वीकारत फलंदाजीस प्रारंभ केला. पहिल्या फळीतील खेळाडूंनी चांगली सुरूवात केली. मात्र, नागपूर माफसू संघ मैदानावर फार टिकाव धरू शकला नाही. अखेर १९.३ षटकांतच सर्व गडी तंबूत पाठवून १२३ धावांवरच नागपूर माफसू संघाला राहुरी संघाने रोखले. अंतिम सामन्यात राहुरी विजेता तर उपविजेता म्हणून नागपूर माफसू संघ ठरला. तिसºया स्थानासाठी मुंबई विद्यापीठ विरूद्ध अकोला कृषी विद्यापीठ संघात खेळला गेला. यात मुंबई संघ विजयी ठरला.परिणामी मुंबई विद्यापीठ संघ तिस-या क्रमांकावर असल्याचे आयोजकांनी जाहीर केले. त्यानंतर अमरावती विद्यापीठाच्या स्व.के.जी. देशमुख सभागृहात बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख, शारीरिक शिक्षण विभागाचे अविनाश असनारे, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, सरचिटणीस विलास सातपुते, निलेश वंदे, संजय ढाकुलकर, प्रेम मंडपे, विठ्ठल मरापे, मनीष शास्त्री आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती